Wednesday, 25 August 2021

 मुंबईमध्ये अधिकृत मुद्रांक विक्रेता बनण्याची संधीया आशयाचा समाजमाध्यमांवर व्हायरल संदेश खोटा;

विश्वास न ठेवण्याचे प्रधान मुद्रांक कार्यालयाचे आवाहन

          मुंबईदि. 24 : मुंबईमध्ये अधिकृत मुद्रांक विक्रेता बनण्याची संधीशासकीय परवाना शासकीय नोकरीप्रमाणे चांगली संधी'  या मथळ्याखाली समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेला संदेश हा चुकीचा आणि खोटा असून  त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रधान मुद्रांक कार्यालयाने केले आहे.

          मुंबई शहर व उपनगरांमध्ये १५० ते २०० अधिकृत मुद्रांक विक्रेता परवाना देण्याच्या संदर्भाने खोटा संदेश व्हायरल होत आहे. प्रधान मुद्रांक कार्यालयामध्ये फक्त १२ अधिकृत मुद्रांक विक्रेते उपलब्ध असल्यामुळे शासनस्तरावर नवीन मुद्रांक विक्रीचे परवाने देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. याबाबतचा अर्ज अपर मुद्रांक नियंत्रक यांचेकडे करावा व शासकीय कार्यालयात संपर्क साधावा अशा आशयाचा संदेश आणि अर्जाचा नमुना समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. सदरचा व्हॉटसॲप संदेश या कार्यालयामार्फत प्रसारित करण्यात आलेला नाही. सदरचा संदेश हा अनधिकृत, खोटा असल्याचे प्रधान मुद्रांक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

 वेळेत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका

ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिले निर्देश

          मुंबईदि. 24: कार्यादेश दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात विलंब करणाऱ्या  कंत्राटदारांमुळे जनतेला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा कंत्राटदारांची माहिती घेऊन त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करावीअसे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामाची आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

          पैठण तालुक्यातील दरकवाडीऔरंगपूरवाडीरहाटगाव येथील ३३/११ के.व्ही.चे उपकेंद्र उभारण्याच्या मागणीच्या प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांना दिली.

          पैठण तालुक्यातील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम त्वरित करण्यात यावे तसेच सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश डॉ.नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले.

          यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेमहावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे हे प्रत्यक्ष तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

000

मुंबईत 28 ऑगस्टला रानभाज्याकृषिमाल विक्री महोत्सव

·      मुंबईत मुलुंडमध्ये प्रथमच आयोजन

          ठाणे, दि. 24 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून 'विकेल ते पिकेलया मोहिमेंतर्गत 'उत्पादक ते थेट ग्राहकया योजनेच्या अंमलबजावणीसाठी 'रानभाज्यामहोत्सव राज्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या  विद्यमाने मुंबईत प्रथमच मुलुंड येथे २८ ऑगस्ट २०२१  रोजी रानभाज्या व कृषि माल महोत्सव व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.

          पावसाळ्यात उगवणा-या विविध भाज्यांची लज्जत सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्या भाज्यांवर उपजीविका असलेल्या आदिवासी बांधव व शेतक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी उत्पादित केलेले भाजीपाला अन्नधान्य तसेच कृषि प्रक्रिया केलेली उत्पादने यांच्या विक्रीसाठी तसेच मुलुंड मधील सर्वच नागरिकांना या उपक्रमाचा लाभ व्हावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

          आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामध्ये रानभाज्यांचे स्थान महत्वाचे आहे. रानभाज्यांमध्ये कंदभाज्याहिरव्या भाज्याफळभाज्याफुलभाज्या या भाज्या पावसाळ्यात येतात व त्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. या रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहचविणे आणि त्यातून आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे याकरिता ठाणेपालघररायगड व नाशिक जिल्ह्यातून विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

          'विकेल ते पिकेलधोरणांतर्गत शेतकरी ग्राहक थेट संकल्पनेवर आधारीत कार्यक्रम राबविण्यासाठी मुलुंड मधील विविध गृहनिर्माण सोसायट्या गटांना जोडुन देवून माहे सप्टेंबर - ऑक्टोबरपासून भाजीपाला व कृषि उत्पादने विक्री करण्याचे नियोजन आहे.  मुलुंड हायस्कूल हॉलआन्ध्र बँकेच्या जवळचंदन बाग रोडपाच रस्तामुलुंड पश्चिममुंबई ४०००८० येथे दिनांक २८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत रानभाज्या व कृषि माल महोत्सव व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त सोसायट्यांनी तसेच ग्राहकांनी प्रदर्शन व विक्रीस भेट द्यावीअसे आवाहन ठाण्याचे जिल्हा अधीक्षक अंकुश माने यांनी केले आहे.

00000

Tuesday, 24 August 2021

 पारगांव भातोडी गावाच्या सर्वांगिण विकासाचा आराखडा सादर करावा

                                             -  ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

            मुंबईदि. 24अहमदनगर जिल्ह्यातील पारगांव भातोडी या गावाला आदर्श गाव म्हणुन विकसित करण्यासाठी राज्याच्या व केंद्राच्या योजनांचा लाभ घेऊन या गावाच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करावाअसे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.

            अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेले हे गाव ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी दत्तक घेतले असून या गावाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

              बैठकीला अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओसवाल अहमदनगर तालुक्याचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे, तहसीलदार उमेश पाटीलमहावितरणचे अभियंता श्री कोपनरविस्ताराधिकारी श्री खाडेग्रामविकास अधिकारी सचिन पवारपारगांवच्या सरपंच मीनाक्षी शिंदेव्याख्याते गणेश शिंदेतसेच संबधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

            ग्रामविकास राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले,पारगांव भातोडी या गावाचा विकास आराखडा तयार करतांना आधी या गावाच्या सीमा निश्चितीचे काम मंत्रालय स्तरावरून करण्यात येईल. त्याचबरोबर या गावातील तळे सुशोभीकरणकिल्ला तसेच ब्रिटीशकालीन भींतीचे संवर्धन व्हावे यासाठी ग्रामविकासपुरातत्व विभाग व पर्यटन विभागाच्या समन्वयाने काम होणे आवश्यक असल्याचे श्री. सत्तार यांनी सांगितले.

            या ठिकाणी असलेले पुरातन शिव मंदीर,वाघेश्वरी देवीचे मंदीर यांचा जिर्णोद्धार तसेच मशिदी समोरील जागेत मुस्लीम समाजासाठी शादीखाना प्रस्तावित करण्यात आले आहे. गावातील शाळेच्या परिसरात मुलांसाठी खेळण्याची जागाग्रामपंचायतीची नवी इमारतविद्युतीकरण व इतर सुशोभीकरणाचे काम प्रस्तावीत आहे.

            अहमदनगर जिल्ह्यातील पारगांव भातोडी हे ऐतिहासिक गाव आहे या गावाला शहाजीराजांच्या लढाईचा इतिहास आहे. अनेक वर्ष विकासापासून वंचित असणाऱ्या पारगांवला ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार त्यांनी दत्तक घेतले आहे.

            यावेळी व्याख्याते गणेश शिंदे आणि सरपंच मीनाक्षी शिंदे यांनी गावाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विविध मागण्या व गावांची सद्य परिस्थिती दर्शवणारे सादरीकरण केले.

***

 पर्यावरणपूरक उद्योगास अनुदान देण्यासंदर्भात अभ्यास करणार

- पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे

            मुंबईदि. 24 : राज्यशासनाने महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी केली असून येत्या काळात सिंगल यूज प्लॅस्टिक मुक्त करण्याचा निर्धार राज्यशासनाने केला आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर करुन विविध प्रकारचे साहित्य आणि इतर उत्पादन निर्मिती करणाऱ्या उद्योगासंदर्भातील प्रस्तावाबाबतचा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबतचा अभ्यास करण्यात येईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

            पर्यावरणपूरक उद्योगास शासनस्तरावर अनुदान मिळण्यासंदर्भात बैठक मंत्रालयात  पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पर्यावरण व वातवरणीय बदल विभागाच्या अधिकाऱ्यांसह सुभाष मालपाणी उपस्थित होते.

            राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले कीप्लॅस्टिकचा वापर करुन विविध पूरक उद्योगधंदे सुरु करता येत असले तरी याबाबत पुरेसा अभ्यास विभागामार्फत करण्यात येईल.

            श्री.मालपाणी यांनी यावेळी राज्य शासनाच्या विविध विभागांचा निधी मिळण्यासाठी पात्रता प्रमाणपत्र मिळविणे कठीण असल्याचे, याशिवाय नियमित निधी न मिळता यासाठी विलंब लागतो, असे नमूद .

 ब्रम्हगिरीसह संतोषा आणि भागडी येथील उत्खननाबाबत

वस्तुस्तिथीदर्शक अहवाल येत्या आठ दिवसात सादर करावा

- पर्यावरण आणि वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे

            मुंबईदि. 24: गेल्या काही दिवसांपासून ब्रम्हगिरीसह संतोषा आणि भागडी डोंगररांग येथे अवैधरित्या उत्खनन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर वनमहसूल आणि पर्यावरण विभागांनी एकत्ररित्या तेथील परिस्थितीची पाहणी करुन यासंदर्भातील वस्तुस्तिथीदर्शक अहवाल येत्या आठ दिवसात सादर करावा, असे निर्देश पर्यावरण आणि वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

            सह्याद्री ब्रम्हगिरी पर्वतरांगेतील संतोषा भागडी डोंगररांग बेलगाव ढसा व सारुळगाव येथील उत्खननाबाबत पर्यावरण आणि वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला वनमहसूलपर्यावरण विभागाबरोबरच सेव्ह ब्रम्हगिरी मोहिम राबविणारे स्वयंसेवक उपस्थित होते.

            राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले कीवनमहसूल आणि पर्यावरण यांनी एकत्ररित्या या सर्व ठिकाणी जाऊन वस्तुनिष्ठ माहिती गोळा करावी. या ठिकाणी पाहणी करीत असताना सेव्ह ब्रम्हगिरी मोहिम राबविणारे स्वयंसेवक यांनी उपस्थित राहावे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे याबाबतचा अहवाल तातडीने तयार करुन सादर करण्यात यावा. ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी सुरुंग स्फोट घडवून गौण खनिजांचे उत्खनन करणे ही बाब अत्यंत गंभीर असून या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येईल असेही श्री. बनसोडे यांनी सांगितले.

            या पाहणीदरम्यान संबंधित समितीने ही गावे इको सेन्सिटिव्हिटी झोन (पर्यावरण दृष्टया संवेदनशील क्षेत्र)बफर झोनमध्ये येत आहे का हे सुध्दा तपासणे आवश्यक आहे. या प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या नियमांची पूर्तता करण्यात आली आहे का हे तपासून याबाबत अहवालात नमूद करण्यात यावे अशा सूचनाही श्री. बनसोडे यांनी दिल्या.

0000

Featured post

Lakshvedhi