Tuesday, 24 August 2021

 बैलगाडी शर्यती आणि सराव पूर्ववत

सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढणार

- पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

          मुंबई : दि. 24राज्यातील बैलगाडी शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धीने संगोपन केले जाते. या करीता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिन्याभरात मार्ग काढण्यात येणार असल्याचे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी  सांगितले.

          मंत्रालयातील त्रिमुर्ती जवळच्या खुल्या प्रांगणात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करण्याविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होत. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटीलगृह राज्यमंत्री (शहरे) सतेज उर्फ बंटी पाटीलआमदार शशिकांत शिंदेनिलेश लंकेकिसन काथोरेअनिल बाबरसंजय जगतापसंग्राम जगतापसंग्राम थोपटे यांच्या सह लोकप्रतिनिधी आणि राज्यातील बैलगाडी मालक आणि संघटनेचे पदाधिकारी तसेच पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

          पशुसंवर्धन मंत्री श्री. केदार म्हणालेसंविधान आणि घटनेचा आदर करुन शर्यतीच्या सरावासाठी कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. येत्या महिन्याभरात योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ज्या राज्यात बैलगाडी शर्यत सुरु आहे. त्यांचाही आभ्यास करण्यात येईल. तसेच याबाबत गरज भासल्यास नवीन कायदा करण्याचाही विचार करण्यात येणार असल्याचेही श्री.केदार यांनी यावेळी सांगितले.

          राज्यात खिल्लार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या जातीचे संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही जात फक्त शर्यतीसाठीच नाही तर दुध उत्पादन आणि पैदास वाढविण्यासाठीही महत्त्वाची आहे. यामुळे देशी जनावरांचे संगोपनास प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. न्यायालयात बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी वरिष्ठ कायदा सल्लागारांचीही मदत घेतली जाणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.

          जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणालेबैलांना सराव महत्त्वाचा आहे. शर्यती आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. यासाठी सराव सुरु करण्यासाठी दिलासादायक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यातील बैलगाडी स्पर्धा पूर्ववत सुरु राहण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करीत आहेत. स्पर्धा सुरु करण्यासाठी सर्व विधानसभा सदस्य सकारात्मक आहेत. मंत्रालयातील प्रांगणात प्रथमच अशी बैठक पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना घेतल्याबद्दल श्री.पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.

          गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील म्हणालेशेतकरी आणि बैलगाडी मालक आणि विविध संघटनांची शर्यत  हा जिव्हाळ्याचा विषय आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. बैलांचा सराव सुरु करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ बैठक बोलावून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

          यावेळी राज्यातून आलेल्या बैलगाडी मालक आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मागण्या व सूचना मांडल्या. उपस्थित आमदारांनी बैलगाडी शर्यतीविषयी मनोगत मांडले.

 कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

- उपमुख्यमंत्री अजित पवार

·       महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा

         

          मुंबईदि. 24 : कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीचा क्रीडाप्रकार आहे. कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठीत्याचा प्रसार-प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी आसोसिएशनच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येतील. तसेच कबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनउपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले.

            अखिल भारतीय कबड्डी फेडरेशन-महाराष्ट्र ऑलिम्पीक असोसिएशनशी संलग्न असणाऱ्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खासदार गजानन किर्तीकरउपाध्यक्ष दिनकर पाटीलशशिकांत गाडेसहकार्यवाह ॲड आस्वाद पाटीलकोषाध्यक्ष मंगल पांडेसहकार्यवाह रविंद्र देसाईविश्वास मोरेसच्चितानंद भोसलेमनोज पाटील यांच्यासह अन्य सदस्य ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेगेल्या दीड वर्षापासून आपण कोरोना संकटाचा सामना करत आहोत. या संकटकाळात महाराष्ट्रातील सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना केला आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहेत्यामुळे आपल्याला अधिक सतर्कपणे काम करण्याची गरज आहे. कबड्डी महर्षी बुवा साळवी यांनी कबड्डी खेळाला मोठ्या उंचीवर पोहोचवले. कबड्डी खेळाची लोकप्रियता आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच कबड्डी खेळाच्या क्रीडा नियमात होणारा बदल आत्मसात करुन ते अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            यावेळी नियमित कामकाज पूर्ण करण्यात आले व पुढील विशेष सर्वसाधारण सभा मंगळवार दि. २१ सप्टेंबर २०२१ सकाळी ११ वाजता मुंबई येथे घेण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

 *स्मृतिगंध .....* 👌🏼👌🏼


मला आठवतंय,...

*खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो !*

सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपण सुद्धा ! 

भरपूर उपभोगलं त्यामुळे. उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात... कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची...

     

*आता तसं नाही...*

लहानपणीच खूप मोठी होतात मुलं ! 

खूप महाग झालंय बालपण !

    

*पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती,* 

फुल टाईम 'आईच' असायची तेव्हा ती !

आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची.

  

*आता 'मम्मी' थोडी महाग झालीय* 

जॉबला जातेयं हल्ली. संडेलाच अव्हेलेबल असते! 

   

*मित्र* सुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा ! हाताची दोन बोटं त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं *बट्टी* म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची. शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात ऑरेंज गोळी गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी ! 


*आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते,* 

*"डोन्ट शेअर युअर टिफिन हं !"* 

मैत्री बरीच महाग झालीय आता. 

   

*हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते !* सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती. 


*घट्ट कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळताना* पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ ! इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूपच महाग झालीत म्हणे !

   

*ज्ञान, शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं.* 

फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किंमतीत मिळून जायची. वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची. 


*आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतलीय,* 

ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज !

   

एवढंच काय, तेव्हाचे 

*आमचे संसार सुद्धा किती स्वस्तात पार पडले.* 

शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो. सकाळी फोडणीचाभात/पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाष्टा करून ऑफिसमध्ये जायचं, जेवणाच्या सुट्टीत (तेव्हा लंच ब्रेक नव्हता) डब्यातली भेंडी/बटाटा/गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड ! रात्री गरम खिचडी, की झाला संसार. ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची. 


*आज सगळंच विचित्र दिसतंय भोवतीनं !* 

Live-in पासून ते Divorce, Suicide पर्यंत बातम्या बघतोय, मुलं बोर्डिंगमधेच वाढतायत, सगळं जगणंच महाग झालेलं ! 

   

*कालपरवापर्यंत मरण तरी स्वस्त होतं,* 

पण आता तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनासं झालंय.

    

*म्हणून म्हणतोय आहोत तोवर आठवत रहायचं,* 

नाहीतरी ह्या *स्मृतीगंधा* शिवाय आहे काय आपल्याजवळ !

🌹🌹🌹🌹🌹🌹

 माथेरान येथील पाणीपुरवठा देयकांकरिता

अभय योजना लागू करण्याबाबत शासन सकारात्मक

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

           

            मुंबई दि.24 : माथेरान येथील योजनेतील ग्राहकांच्या पाणीपुरवठा देयकांकरिता अभय योजना लागू करण्याबाबत शासन सकारात्मक आहे असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. माथेरान पाणीपुरवठा देयकासंदर्भात मंत्रालयात श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.

              माथेरान येथील प्रलंबित पाणीपुरवठा देयकांवरील व्याजात सवलत देण्यासाठी व योजनेच्या ग्राहकांना पाणीपुरवठा देयके भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अभय योजना लागू करण्याचा शासनाचा मानस आहे. त्याबाबत कार्यवाही सुरू असून लवकरच  सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे  श्री.पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ठाणे येथील मुख्य अभियंत्यांनी पुढील आठवड्यात  प्रत्यक्ष माथेरानला जाऊन पाणी पुरवठा योजनेची पाहणी करावी असे निर्देशही मंत्री श्री.पाटील यांनी  दिले.त्यांच्या भेटीनंतर आपण स्वतः पुढील महिन्यात या योजनेची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

               यावेळी माथेरानच्या नगराध्यक्ष श्रीमती प्रेरणा सावंत,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर,पाणी पुरवठा विभागाचे सहसचिव प्रवीण पुरी,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणेचे मुख्य अभियंता प्रकाश नंदनवरे,कार्यकारी अभियंता विजय सूर्यवंशी,माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव आदि उपस्थित होते.

0000

 तांडा वस्तीच्या विकासासाठी लोकसंख्येवर आधारित निधी मिळणार

 बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

 

·        अकरा जिल्हयामंध्ये नव्याने बंजारा विकास समिती स्थापन होणार

·        तांडा वस्ती सुधार योजनेतंर्गत संत श्रेष्ठ रामराव महाराज सभागृह बांधता येणार

 

            मुंबईदि.24 : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतंर्गत विकासकामांना देण्यात येणारा निधी तांडा वस्तीच्या लोकसंख्येवर आधारित देण्यात येणार आहे.बंजारा समाजाची लोकसंख्या जास्त आहे अशा बंजाराबहुल 11 जिल्हयांमध्ये बंजारा समाजातील व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली अशासकीय समिती स्थापन करण्यात येणार असून तांडा वस्ती सुधार योजनेतंर्गत संत श्रेष्ठ रामराव महाराज सभागृह या नावाने नवीन कामाचा समावेश करण्यात आला आहे. या सभागृह बांधकामासाठी तांडा वस्तीच्या लोकसंख्येवर आधारित  निधी देण्यात येणार आहे अशी माहिती  इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार  यांनी दिली.

               बहुजन कल्याण मंत्री श्री.वडेट्टीवार  म्हणालेतांडा-वस्ती सुधार योजनेसाठी यापूर्वी दिला जाणारा निधी मर्यादीत आहे.तांडा वस्तींची लोकंसख्या हा मुद्दा लक्षात घेतला जात नसल्यामुळे  विकासकामे करताना अडचणी येत त्यामुळे या समाजातील प्रतिनिधींनी तांडा-वस्ती सुधार योजनेमध्ये सुधारणा करावी अशी मागणी केली होती.त्यानुसार तांडा-वस्ती सुधार योजनेतंर्गत आता १०० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तांडा वस्तीला १५ लाख रूपये१०० ते १५० लोकसंख्या असलेल्या तांडा वस्तीला २० लाख रूपये तर १५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तांडा वस्तीला २५ लाख रूपये निधीचे वितरण करण्यात येणार आहे.

           बंजारा समाजाच्या विकासासाठी राज्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे.मात्र बंजारा  बहुल लोकसंख्या असणा-या जिल्ह्यात बंजारा समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणा-या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी पालकमंत्री यांच्याऐवजी त्या समाजातील व्यक्तीची नियुक्ती व्हावी अशी बंजारा समाजाची मागणी होती.बंजाराबहुल समाज असलेले बुलढाणा,यवतमाळनांदेडजालनापरभणीबीडसोलापूरऔरंगाबादलातुरहिंगोली,वाशिम हे अकरा जिल्हे आहेत.या जिल्हयात बंजारा समाजाची जिल्हास्तरीय समिती करून बंजारा समाजाचे प्रतिनिधी नेमण्यात येणार आहेत.       

            तांडा-वस्ती सुधार योजनेतंर्गत कामांमध्ये लोकसंख्येवर आधारित कामांमध्ये संत श्रेष्ठ रामराव महाराज सभागृह या नावाने नवीन कामाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.तांडा वस्तीच्या लोकसंख्येवर आधारित सभागृह बांधण्यासाठी निधी देण्यात येणार आहे.१०० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तांडा वस्तीला १५ लाख रूपये१०० ते १५० लोकसंख्या असलेल्या तांडा वस्तीला २० लाख रूपये तर १५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तांडा वस्तीला २५ लाख रूपये निधीचे सभागृह बांधण्याकरिता निधीचे वितरण करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.वडेट्टीवार माहिती देताना म्हणाले.

 एक सुबह होगी 😊😊


जब लोगों के कंधों पर ऑक्सीजन सिलेंडर नहीं दफ्तर का बैग होगा, 


गली में एंबुलेंस नहीं स्कूल की वैन होगी, 


और भीड़ दवाखानो  पर नहीं चाय की दुकानों पर होगी, 


एक सुबह होगी ❤❤


जब पेपर के साथ पापा को काढ़ा नहीं चाय मिलेगी, 


दादाजी बाहर निकल कर बेखौफ पार्क में गोते लगाएंगे, 


और दादी टेरेस पर नहीं मंदिर में जल चढ़ाकर आएंगी, 


एक सुबह होगी 😍😍


जब हाथोंं में कैरम और लूडो नहीं बैट और बॉल होगा, 


मैदानों में सन्नाटा नहीं शोर का भार होगा, 


शहरों की सारी पाबंदियां हटेगी और फिर से त्यौहार होगा, 


एक सुबह होगी 🙏🙏


जब जी भर के सबको गले लगाएंगे, 


कड़वी यादों को दफन कर फिर से मुस्कुराएंगे, 


और दुनिया को कह देंगे नजरे झुका लो हम फिर से वापस आए हैं ।।


एक सुबह होगी 😊😊😊😍

 एक सुबह होगी 😊😊


जब लोगों के कंधों पर ऑक्सीजन सिलेंडर नहीं दफ्तर का बैग होगा, 


गली में एंबुलेंस नहीं स्कूल की वैन होगी, 


और भीड़ दवाखानो  पर नहीं चाय की दुकानों पर होगी, 


एक सुबह होगी ❤❤


जब पेपर के साथ पापा को काढ़ा नहीं चाय मिलेगी, 


दादाजी बाहर निकल कर बेखौफ पार्क में गोते लगाएंगे, 


और दादी टेरेस पर नहीं मंदिर में जल चढ़ाकर आएंगी, 


एक सुबह होगी 😍😍


जब हाथोंं में कैरम और लूडो नहीं बैट और बॉल होगा, 


मैदानों में सन्नाटा नहीं शोर का भार होगा, 


शहरों की सारी पाबंदियां हटेगी और फिर से त्यौहार होगा, 


एक सुबह होगी 🙏🙏


जब जी भर के सबको गले लगाएंगे, 


कड़वी यादों को दफन कर फिर से मुस्कुराएंगे, 


और दुनिया को कह देंगे नजरे झुका लो हम फिर से वापस आए हैं ।।


एक सुबह होगी 😊😊😊😍

Featured post

Lakshvedhi