Tuesday, 17 August 2021

* रोजच्या जीवनात उपयुक्त माहिती... * १) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ? *उत्तर :-* ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो. *२) स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये?* *उत्तर :-* ही सौभाग्य देणारी आहे म्हणून. *३) देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी ?* *उत्तर :-* ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी . *४) शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी.* *उत्तर :-* शिवसुत्र आहे महादेवाचे. रद्रगण, पितृगण,लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात .त्याना प्रदक्षिणा होईल म्हणून. *५) एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत ?* *उत्तर :-* प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून. *६) गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये ?* *उत्तर :-* हा मंत्रराज आहे, ज्या मंत्राना बीज असतात, ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून .... *७) शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत ?* *उत्तर :-* शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून .. *८) निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र का घालू नये ?* *उत्तर :-* तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे . म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही . नाहीतर तम तत्व वाढेल . राक्षसी संकटे येतील म्हणून . *९) देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत ?* *उत्तर:-* त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून ... *१०) विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये ?* *उत्तर :-* फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून .. *११) शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये ?* *उत्तर :-* शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून... सर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनादही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते . सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणुन... देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो . शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही . ती हिरण्यगर्भा आहे . ती प्रसूति वैराग्य आहे .. *१२) आपली जपमाळ व आसन कधीही दुस-यास वापरण्यास का देवू नये ?* *उत्तर:-* त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते . ते दुस-यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो. *१३) देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे.* *उत्तर :-* हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत . अंगठा -आत्मा/ तर्जनी -पितर/ मध्यमा-स्वतः/अनामिका -देव/करंगळी -ऋषी / म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे... *१४) समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत.* *उत्तर :-* विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून...... *१५) अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये.* *उत्तर :-* पितराना दोष लागतो म्हणून . *१६) उंब-यावर बसून का शिंकू नये.* *उत्तर :-* उबरा हा मुळात बसण्यासाठी नाही तेथे सर्वतिर्थे बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकुन घडतो म्हणून..... घडल्यास पाणी शिंपडावे...... *१७) निजलेल्या माणसास का ओलांडून जावू नये.* *उत्तर :-* झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून .. *१८) मांजराना प्रेत ओलांडून का देवू नये.* *उत्तर :-* प्रेत प्रेतच राहते म्हजे पिशाच्च योनित जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून .. *१९) रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुस-यास का देवू नयेत ?* *उत्तर :-* याच्यात करणीतत्व आहेत. आकर्षण क्रिया पटकन होते व बळीतत्त्व आहे म्हणून .... *२०) सायंकाळी केर का काढु नये?* *उत्तर :-* लक्ष्मीला आवडत नाही . लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते... *२१) रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा.* *उत्तर :-* शव= शिव म्हणून नमस्कार करावा.... *२२) कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे ?* *उत्तर :-* येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते... *२३) एका हाताने देवाला नमस्कार का करू नये.* *उत्तर :-* दश इन्द्रियाचा नमस्कार मह्त्वाचा असतो . पंचतत्त्वाचा नाही ... *सर्वांना ही माहिती द्या..*
*"कोणाचं घरटं मोडू नका." सत्य घटना* ✍️🙏 *खूप सुंदर लेख* *टी.एन्.शेषन् भारताचे मुख्यनिवडणूक आयुक्त होते.त्ंच्या जीवनात घडलेला प्रसंग !* *एकदा ते आपली पत्नी जयलक्ष्मी शेषन् यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले होते.उत्तरप्रदेशातल्या एका सुंदर रस्त्यावरून गाडी जात होती.रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती.वर्दळीचा रस्ता नसल्यामुळे की काय ,पक्ष्यांची अनेक ,सुंदर घरटी झाडांची शोभा वाढवत होती.* *जयलक्ष्मी यांना हे दृष्य खूप आवडलं .त्यांना वाटायला लागलं आपल्या घराच्या बागेसाठी यातली दोन घरटी नेली ,तर बाग किती शोभून दिसेल.त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.* *गाड्या थांबल्या.त्यांच्यासाठी जे संरक्षक पोलीस दल होते ,ते इकडे तिकडे शोधायला लागले.तिथे एक मुलगा गुरं चरायला आला होता.त्याला बोलावलं.तो सरकारी इतमाम पाहून कोणीतरी मोठी अधिकारी व्यक्ति आलीय ,हे त्यानी ओळखलंच.त्यांनी मुलाला दोन घरटी काढून आणायला सांगितली ,आणि प्रत्येक घरट्याचे १० रु.देऊ असंही सांगितलं.त्या मुलानं खाली मान घालून नकारार्थी मान हलवली.* *"दहा रुपये कमी वाटतायंत का ,५०रुपये देऊ प्रत्येक घरट्याचे."* *यावर तो मुलगा म्हणाला ,"सरजी,पैशाचा सवालच नाहीए .कितीही पैसे दिलेत तरी ती घरटी मी झाडावरून उतरवणार नाही."* *"का रे बाबा?"* *"त्यात पक्ष्याची पिल्लं शांतपणे आणि विश्वासानी झोपली आहेत.सायंकाळी त्यांची आई चोचीत दाणे घेऊन पिल्लांच्या ओढीनं येईल ,पिल्लं सापडली नाहीत तर ती सैरभैर होईल ,आक्रोश करेल,ते माझ्याच्यानं पाहवणार नाही.कोणाचं घर मोडायचं पाप आहे ना सर जी."* *हे ऐकून शेषन् व त्यांची पत्नी थक्क झाले.* *शेषन् म्हणाले ,"कोणीतरी डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं.माझं पद ,माझी पदवी ,उच्च शिक्षण सार्‍या सार्‍याचा अभिमान क्षणार्धात गळून पडला ,वितळून गेला.जे शिक्षण , संस्कृती आणि संस्कार या मुलानं निसर्गाकडून शिकलेत.ते शिक्षण कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही.".* *पद,सत्ता,श्रीमंती,ताकद याचा उपयोग करा दुरुपयोग करू नका. कारण सोबत गरीबावर केलेले उपकार येतात, गरिबांचा शाप हा येणाऱ्या पिढीवर संस्कार घालणारा आणि अधोगती कडे नेणारा असतो.* *🌷सोशल मिडीयाचा वापर लोकांना प्रभावित करण्यासाठी नाही तर लोकांच्या आचरणात आणि विचारात परिवर्तन करण्यासाठी करा.🌷*🙏🏻

Add

Add

 वन्दे मातरम्

सुजलां सुफलाम्

मलयजशीतलाम्

शस्यश्यामलाम्

मातरम्।


शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्

फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्

सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्

सुखदां वरदां मातरम्॥ १॥ 


सप्त-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले

द्विसप्त-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले,

अबला केन मा एत बले।

बहुबलधारिणीं 

नमामि तारिणीं

रिपुदलवारिणीं 

मातरम्॥ २॥


तुमि विद्या, तुमि धर्म

तुमि हृदि, तुमि मर्म

त्वम् हि प्राणा: शरीरे

बाहुते तुमि मा शक्ति,

हृदये तुमि मा भक्ति,

तोमारई प्रतिमा गडी मन्दिरे-मन्दिरे॥ ३॥


त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी

कमला कमलदलविहारिणी

वाणी विद्यादायिनी,

नमामि त्वाम्

नमामि कमलाम्

अमलां अतुलाम्

सुजलां सुफलाम् 

मातरम्॥४॥


वन्दे मातरम्

श्यामलाम् सरलाम्

सुस्मिताम् भूषिताम्

धरणीं भरणीं 

मातरम्॥ ५॥

 [8/17, 6:15 AM] Gym Bhosalee: पतीचे डोके दाबून देत असताना, पत्नीने हळूवारपणे विचारले 

*"लग्नापूर्वी तुमचे डोके कोण दाबून देत होतं ?"*


 पतीने साधे हृदयस्पर्शी उत्तर दिले . . .

*"लग्नापूर्वी डोकेदुखी नव्हती . . ."*

🤪🤣😂😋

[8/17, 6:15 AM] Gym Bhosalee: मुलीकडचेः *मुलगा दारु पितो का ?*


मुलाकडचेः  *हो,रोज पितो.*


मुलीकडचेः *याचा अर्थ तो चांगलं कमावतो* 


हे *स्थळ आम्हाला पसंत* आहे.


*रिश्ता वही सोच नयी.* 😂😂

 जॉनी लिव्हर

अभिनेता

१४ ऑगस्ट १९५६


जॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांचे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा हे मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे. जॉनीचे वडील गिरणी कामगार होते. वडिलांचे मोठे भाऊ व त्यांचे कुटुंब अशी एकूण आठावर माणसे एका घरात राहायची. त्यांच्या परिसरात दाक्षिणात्यबहुल वातावरण होते. पण मराठी माणसेही भरपूर होती. सतत काही ना काही चालायचे. सण-वार असायचे, पूजा असायच्या, बारशी असायची व लग्नेही असायची. त्यामुळे कुठल्या न कुठल्या निमित्ताने सदैव लाऊडस्पीकरवर दाक्षिणात्य भाषांतील, हिंदी, मराठीतील गाणी चालू असायची तो काळ रेकॉर्ड डान्सचा होता. ध्वनिमुद्र्का लावून गाण्यावर मुले-मुली नाचायची. रात्री कार्यक्रम असायचे. कधी कधी रात्री रस्त्यावर मधोमध पडदा उभा करून चित्रपट दाखवला जाई व जॉनी लिव्हर आणि मंडळी एकत्र बसून तो पाहात असत. या वातावरणाचा जॉनीवर नकळत परिणाम घडला. 


असे सारे ठीक सुरू असताना वडिलांचे दारूचे व्यसन वाढले व जॉनीच्या नशिबाचे चक्र फिरले. त्यांचे कुटुंब किंग्ज सर्कलच्या झोपडपट्टीत राहायला आले. जॉनी वडाळ्याच्या आंध्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमधे तेलुगू माध्यमाच्या शाळेत शिकत होते. सात रुपये फी होती तीही देणे परवडत नव्हते. महिनाअखेरीस बाकावर उभे राहायचे किंवा वर्गाबाहेर जायचे. कधी कधी वेताच्या छड्या मिळायच्या. त्या वयातच जॉनी लिव्हर यांना जबाबदारीची जाणीव झाली होती. ते नकला करायचे. रेकॉर्ड डान्स करायचे. पैसे मिळायचे, ते घरी आईला द्यायचे. त्यामुळे अर्थात रात्री घरी उशिरा पोचायचे. दुसऱ्या दिवशी शाळेत जायला उशीर होई. मग शिक्षक ओरडत. मग ते मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना नाचून वगैरे दाखवून खूश ठेवायचा प्रयत्‍न करीत. वर्गात अभ्यासात यथातथाच होते. पण मनात आले तर काहीही करायचे. नेहमी पहिला येणाऱ्या मुलाने रुबाब दाखवला, तेव्हा जॉनीने त्याला पुढच्या सहामाहीत भरपूर अभ्यास करून वर्गात दुसरा येऊन दाखवले. 


फीचे पैसे नसल्यानं जॉनीला अपमानास्पदरीत्या सातव्या वर्गात असतानाच शाळा सोडावी लागली. मग जगण्यासाठी त्याने काहीही केले. देशी दारूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केले. फडकी मारली, ग्लास धुतले, रस्त्यात उभं राहून बॉलपेनं, गोळ्या विकल्या. रोज दोन-तीन रुपये सुटायचे. त्यातल्या चौदा आण्यांचे डाळ-तांदूळ, दोन आण्यांचे कांदे-बटाटे, मसाला घरी आणायचो, तेव्हाच घरी जेवण बनायचे पुढे जॉनी बसस्टँडवर फेरीवाला म्हणून करू लागला. तो तेथे सिनेस्टार्सची नक्कल करत करत व्यवसाय करीत असे. वयाच्या सतराव्या वर्षी मी गल्लीतल्या गणपती उत्सवात पहिली जाहीर मिमिक्री केली. लोकांना ती खूप आवडली. तेव्हा तीस रुपये मिळाले. नंतर १८व्या वर्षी हिंदुस्थान लिव्हर या कंपनीत कामाला लागला. सातवी नापास मुलाला जे काम मिळणार तेच मिळाले- स्वीपरचे. झाडू मारणे फरशा पुसणे वगैरे कामे असायची. त्यात एक काम होते रसायनांचे ड्रम उघडण्याचे व ते साफ करून ठेवण्याचे. पहिल्याच वेळी जॉनीने ड्रम उघडला व तो पुसला, त्यात डोके घातलं व उगाच आवाज काढला. तो घुमला. त्याला गंमत वाटली. पुन्हा दुसरा आवाज काढला. नंतर अनेक आवाज काढले. रोजच तसे केल्यावर जॉनीला जाणवले की त्याच्या नकलांच्या आवाजावर चांगला परिणाम होतोय. वेगवेगळे आवाज काढायचो. एका कामगाराने तक्रार केली. मग त्याच्या सुपरवायझरने त्याला जाब विचारण्यासाठी बोलावले. त्याला जॉनीने तर्‍हे-तर्‍हेच्या नकला करून दाखवल्या. तर तो खूशच झाला आणि त्याने जॉनीला गेट्टुगेदरमध्ये संधी दिली. रंगभवनच्या त्याया संमेलनात शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, अशोककुमार आदींची मिमिक्री करून जॉनीने सारे सभागृह दणाणून सोडले. एक हास्याभिनय केला. त्यानंतर जॉनी क्षणात लोकप्रिय झाला. मग त्याला कंपनीत जरा कमी कष्टाचे काम मिळू लागले 

दुपारच्या वेळात नकला करून जॉनी मित्रांना हसवायचे. एकदा तो कंपनीच्या आमच्या साहेब लोकांची नक्कल करत होते व कामगारमित्र तो साहेब कोण ते ओळखत होते. युनियनच्या लीडर, सुरेश भोसलेंनी ते पाहिले व ते म्हणाले, ‘अरे याने तर लिव्हरचा बॅण्ड वाजवला, आजपासून याला जॉनी नाही, जॉनी लिव्हर म्हणायचे.’ त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमात जॉनीने स्वतःची ओळख जॉनी लीव्हर अशी करून दिली व तेव्हापासून तेच त्यांचे व्यावसायिक नाव झाले. 


यानंतर त्याने ऑर्केस्ट्रामध्ये काम केले. गाण्यांच्या मध्यंतरादरम्यान तो हास्याभिनय करीत असे. बाहेर कार्यक्रमांचे पैसे बऱ्यापैकी मिळू लागले म्हणून सात वर्षांनी जॉनीने नोकरी सोडली. त्यांच्या कार्यक्रमाची पहिली व्हिडीओ कॅसेट आली होती. नंतर तो कल्याणजी आनंदजी यांचे समवेत जगभर फिरला. 


अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जॉनीने पहिल्यांदा अमेरिका पाहिली. एकदा, १९८० मध्ये कल्याणजीभाईंच्या येथे कॅरम खेळत अस्ताना. त्यांच्याकडे एक दाक्षिणात्य निर्माता आला. त्याला हिंदी चित्रपटासाठी एक मिमिक्री कलाकार हवा होता. कल्याणजीभाईंनी जॉनीकडे बोट दाखवलं. काही कळायच्या आत, जॉनीच्या हातात मद्रासचे विमानाचे तिकीट आले. मग रिहर्सलच्या वेळी त्याने दिग्दर्शकाला साधीशी मिमिक्री करून दाखवली. तर दिग्दर्शक ‘व्हेरी गुड’ म्हणाले. ‘आता दाखवलं ते व्हेरी गुड काय. मग माझ्याकडचं चांगलं दाखवतोच,’ असा विचार करून जॉनीने दुसरी नक्कल दाखवली. ते खूप खूष झाले. 


जॉनीची चित्रपटात एंट्री झाली, पण अनेक वर्षे ते मी मिमिक्रीच करायचे. त्यांना अभिनयाची संधीच मिळत नव्हती. ती एन. चंद्रांनी ‘तेजाब’मधून दिली. ती भूमिका कशी करायची, तिचे विविध पैलू त्यांनी समजावून सांगितले. त्यात जॉनीने त्याचे रंग भरले. त्यानंतर लोकांनी त्याला अ‍ॅक्टिंग कलाकार म्हणून स्वीकारले. पुढे त्याने 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात काम केले. त्यानंतर मात्र त्याला अनेक चित्रपटात कामे मिळाली. या चित्रपटांची संख्या ४००हून खूप अधिक आहे. इ.स. १९९६-९७ पर्यंत जॉनी लिव्हर यांनी खूप कॉमेडी शोज केले. आणि मग १७ वर्षे विश्रांती घेऊन परत सुरू केले. मध्यंतरीच्या काळात अनेक पुस्तके वाचली, विनोदी आणि विनोदावरची पुस्तके वाचले, अनेक कलाकारांचे शोज पाहिले, टी.व्ही.वर अनेक चित्रपट पाहिले आणि मग परत चित्रपटांतही पुनरागमन केले. जॉनी यांनी बऱ्याच मराठी चित्रपटांमध्येही काम केलं. ‌‘भुताचा भाऊ’, ‘चंबू गबाळे’, ‘घायाळ’, ‘खतरनाक’ हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट.

Featured post

Lakshvedhi