सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 18 August 2021
संत गाडगेबाबांच्या विचारसरणीवर काम करीत राहणार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
· प्रबोधनकार ठाकरे लिखित 'श्री गाडगे बाबा' जीवनचरित्राच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन
· संत गाडगेबाबा यांचे विचार जगभर पोहचविण्याची गरज
मुंबई, दि. 17 : श्री गाडगेबाबा महाराजांच्या विचारसरणीनुसार आमचे सरकार काम करीत असून, त्यांच्या जीवनचरित्राचे विविध भाषांमध्ये भाषांतर करून त्यांचे कार्य जगभरात पोहचवले पाहिजे, त्यासाठी राज्यशासन आवश्यक ती सर्व मदत करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रबोधनकार ठाकरे लिखित 'श्री गाडगे बाबा' जीवनचरित्राच्या संत गाडगे महाराज मिशनच्यावतीने प्रकाशित दहाव्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याहस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे पार झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री तथा गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षा ॲड. यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार उल्हास पवार, इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार, मिशनचे चेअरमन मधुसूदन मोहिते- पाटील आदी उपस्थित होते.
संत गाडगेबाबांनी अंधश्रद्धेवर आघात करून खरा धर्म शिकवला, असे सांगून मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, धर्म जगणे आणि धर्म जपणे यातील अंतर आपल्याला समजले पाहिजे. धर्म जगायचा असतो हे बाबांनी कृतीतून दाखवून दिले. भुकेल्याना अन्न, तहानलेल्याना पाणी, गरीब मुलामुलींना शिक्षण आदी दशसूत्रीतून हाच खरा धर्म आहे हे त्यांनी असंख्य व्याख्यानांतून जनतेपर्यंत पोहोचवले. त्यांनी कीर्तनातून लोकशिक्षण घडवले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, आजोबा प्रबोधनकारांनी लिहिलेल्या आणि वडील बाळासाहेब ठाकरे यांनी मुखपृष्ठ चितारलेल्या या जीवनचरित्राचे प्रकाशन मुख्यमंत्री म्हणून करताना मला मनापासून आनंद होत आहे. प्रबोधनकार आणि संत गाडगेबाबा यांच्यात एक अनोखे नाते होते. गाडगेबाबांनी वक्तृत्वातून समाजातील अनिष्ठ प्रथांविरुद्ध लोकांचे प्रबोधन केले. त्यांनी केवळ कीर्तने केली नाहीत तर शाळा उभारल्या, अन्नछत्रे सुरू केली, धर्मशाळा बांधल्या. गाडगेबाबांचे विचार पुढे नेण्यासाठी मिशनने काम करत राहावे, महाराष्ट्र शासन मिशनच्या पाठीशी खंबीर उभे राहील, अशी ग्वाही श्री. ठाकरे यांनी यावेळी दिली.
महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, संत गाडगेबाबा हे कृतीमधील आणि विचारामधील स्वच्छता जोपासणारे संत होते. गाडगेबाबा, प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा देशामध्ये पोहोचवायचा असेल तर त्यांचे पुस्तकरूपी जीवनचरित्र प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था व्हायला हवी. धर्म, जातीभेदांमध्ये वाढ करणाऱ्या विभाजनवादी शक्तींबाबत जनजागृती करायची असेल तर हे पुस्तक उपयुक्त ठरेल. गाडगेबाबांची 2026 मध्ये 150 वी जयंती असून त्यानिमित्ताने मिशनमार्फत विविध उपक्रम हाती घेतले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. मंजुश्री पवार आणि श्री. उल्हास पवार यांनी मनोगतामध्ये प्रबोधनकार आणि संत गाडगेबाबा यांच्यातील विचार आणि कृतीतील साम्याविषयी भाष्य केले. जात-पात, धर्म यातील फोलपणा गाडगेबाबांनी आपल्या वाणीतून लोकांना दाखवून दिला. त्यासाठी लोकांच्या बोलीभाषेतून संवाद साधला. प्रबोधनकार, गाडगेबाबांचे विचार केवळ इतिहासाचे भाग नाही तर वर्तमानाला दिशा देणारे आहेत. वैयक्तिक हितसंवर्धनाशिवाय परिवर्तन होऊ शकते हे गाडगेबाबा आणि प्रबोधनकार यांनी सिद्ध केले, असेही सांगितले.
यावेळी मिशनच्यावतीने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना संत गाडगेबाबा यांची प्रतिमा आणि संदेश असलेले सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. तसेच डॉ. मंजुश्री पवार यांच्याकडून राजर्षी शाहूमहाराज पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ भेट देण्यात आले.
फ्लिपकार्टच्या राज्यातील प्रकल्पविस्तारामुळे
रोजगार, गुंतवणूक वाढेल
- उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई, दि. 17 : ई कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्ट कंपनीने आपल्या सेवाप्रकल्पांचा विस्तार केल्यामुळे राज्याच्या औद्योगिक प्रगतीस ते पूरकच ठरेल, याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल व गुंतवणुकीतही वाढ होईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे व्यक्त केला.
कोविडमुळे मागील दीड वर्षांपासून अनेक उद्योगांचे विस्तार रखडलेले असताना फ्लिपकार्ट कंपनीने या संकटावर मात करत आपल्या प्रकल्पाचा विस्तार केला. ही बाब राज्याच्या प्रगतीसाठी महत्वाची आहे. राज्याला उद्योगक्षेत्रात पुढे नेण्यासाठी फ्लिपकार्टने उचलेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. याद्वारे गुंतवणुकीचा ओघ वाढेल, शिवाय बेरोजगार तरुणांच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असे श्री. देसाई म्हणाले.
भिवंडी व नागपूर येथे प्रकल्प विस्तार करण्यात आला आहे. ग्राहकांची मागणी वाढू लागल्याने व वेळेत वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी हा प्रकल्पविस्तार करण्यात आला आहे. भिवंडी येथे सुमारे सात लाख चौरस फूट जागेवर हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याद्वारे चार हजार जणांना रोजगारांची संधी मिळणार आहे. दुसरा प्रकल्प नागपूर येथे होणार आहे.
राज्यातील स्थानिक व्यापारी, विक्रेते व लघु, मध्यम उद्योगांमधून तयार होणाऱ्या वस्तुंना यामुळे बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास फ्लिपकार्टचे वरिष्ठ अधिकारी रजनीश कुमार यांनी व्यक्त केला.
००००
म्हाडाने तळीये गावातील घरांची पुनर्बांधणी विहित कालमर्यादेत करावी
- गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड
· सातही वाड्यांमधील 261 घरांची पुनर्बांधणी म्हाडा 'प्री-फॅब' पद्धतीने करणार
मुंबई दि. 17 : रायगड जिल्ह्यातील तळीये गावातील सर्व सातही वाड्यांमधील एकूण 261 घरांची पुनर्बांधणी म्हाडाने विहित काल मर्यादेत 'प्री-फॅब' पद्धतीने पूर्ण करावी, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले. तळीये गावाच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योग राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री कु.अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड म्हणाले,तळीये गावातील घरांच्या पुनर्बांधणीसाठी मदत व पुनर्वसन विभागाने म्हाडास जागा उपलब्ध करून द्यावी.तसेच तेथे रस्ते, वीज, पाणी, शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने म्हाडास आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा.त्यानुसार म्हाडाने लेआऊट तयार करून त्याचा विकास एजन्सी म्हणून करावा. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यात तळीये येथे जाऊन जागेची पाहणी करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर,मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता,रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष मुख्याधिकारी योगेश म्हसे, म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन महाजन, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अरुण डोंगरे, उपसचिव सुनील तुंबारे उपस्थित होते.
माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी संस्थात्मक कार्य उभे रहावे
- सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
· मुधोजी हायस्कूलच्या गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार
मुंबई, दि. 17: फलटण एज्युकेशन सोसायटी आणि मुधोजी हायस्कूल यांचे शिक्षण प्रसाराचे कार्य शंभरपेक्षा अधिक वर्षापासून अव्याहतपणे सुरु आहे. शालांत परीक्षा 1990 तुकडीच्या उल्लेखनीय कार्यातून सर्वं माजी विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन माजी विद्यार्थी संघटनेची उभारणी करावी, अशा संस्थात्मक कार्य उभारणीतून नव्या पिढीचे भविष्य घडविले जावे, संकटग्रस्तांचे अश्रू पुसले जावेत आणि गरजवंताना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्री.रामराजे नाईक- निंबाळकर यांनी व्यक्त केली.
विधानभवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती, श्री.रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या शुभहस्ते मुधोजी हायस्कूल, तालुका फलटण जि. सातारा येथील 1990 च्या इयत्ता 10 वी तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांच्या संस्थेने, आपापल्या क्षेत्रात उच्चपदावर पोहोचलेल्या सह-अध्यायींचा सत्कार आयोजित केला. त्याप्रसंगी सत्कारमूर्ती आणि उपस्थितांना संबोधित करतांना सभापती श्री.रामराजे नाईक- निंबाळकर बोलत होते. विधानभवनातील, मध्यवर्ती सभागृहात आयोजित या कौटुंबिक परंतु आगळ्यावेगळ्या समारंभामुळे उपस्थित फलटणकरांसह सर्वांच्याच मनात आनंदाचा ठेवा बनून राहिलेल्या शालेय जीवनातील स्मृतींना उजाळा मिळाला.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचेहस्ते कोरोना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ.सुजाता खाडे-ढोले, मुंबई उच्च न्यायालयात वकीलीची 23 वर्षे पूर्ण केलेले ॲडव्होकेट विश्वनाथ टाळकुटे, तसेच श्रीमती विजया गाडे-सांगळे यांचे सुपुत्र आणि भारतातील पहिला विगन टेनिसपटू श्री.विश्वजित सांगळे यांचा 'स्नेहदर्पण' पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमूर्तींना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री.राजेन्द्र भागवत, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त श्री.दिलीप ढोले, निवृत्त सह सचिव श्री.भाई मयेकर, माऊली फाऊंडेशन काळबादेवीचे अध्यक्ष डॉ.सिंगन, श्री.मोहन भोसले, श्री.प्रसन्न रुद्रवते, श्री.महेंद्र काज, साठे व रुईया कॉलेजचे प्राध्यापक श्री.चंद्रशेखर नेने, श्री.मनोज माने समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या समारंभामुळे समाजकार्यांत आणखी मोठे योगदान देण्याची प्रेरणा आणि बळ आम्हांला प्राप्त झाले अशी भावना सत्कारमूर्तींनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास श्री.नसीर शिकलगार, श्री.असीम तांबोळी, श्री.अमोल जोशी, श्री.मनिष निंबाळकर, श्री.किरण गोरे, श्रीमती शर्मिला चव्हाण, वि.स.पागे., संसदीय प्रशिक्षण केंद्र, संचालक श्री.निलेश मदाने, श्री.संजय खानोलकर यांचेसह मुधोजी हायस्कूल फलटणचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दीपाली मनिष निंबाळकर,गौरवपत्राचे वाचन श्रीमती शितल साळे आणि आभारप्रदर्शन श्रीमती श्रध्दा सांगळे यांनी केले.
००००
Tuesday, 17 August 2021
* रोजच्या जीवनात उपयुक्त माहिती... *
१) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ?
*उत्तर :-* ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो.
*२) स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये?*
*उत्तर :-* ही सौभाग्य देणारी आहे म्हणून.
*३) देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी ?*
*उत्तर :-* ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी .
*४) शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी.*
*उत्तर :-* शिवसुत्र आहे महादेवाचे. रद्रगण, पितृगण,लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात .त्याना प्रदक्षिणा होईल म्हणून.
*५) एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत ?*
*उत्तर :-* प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून.
*६) गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये ?*
*उत्तर :-* हा मंत्रराज आहे, ज्या मंत्राना बीज असतात, ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून ....
*७) शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत ?*
*उत्तर :-* शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून ..
*८) निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र का घालू नये ?*
*उत्तर :-* तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे . म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही . नाहीतर तम तत्व वाढेल . राक्षसी संकटे येतील म्हणून .
*९) देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत ?*
*उत्तर:-* त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून ...
*१०) विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये ?*
*उत्तर :-* फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून ..
*११) शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये ?*
*उत्तर :-* शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून...
सर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनादही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते . सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणुन...
देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो . शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही . ती हिरण्यगर्भा आहे . ती प्रसूति वैराग्य आहे ..
*१२) आपली जपमाळ व आसन कधीही दुस-यास वापरण्यास का देवू नये ?*
*उत्तर:-* त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते . ते दुस-यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो.
*१३) देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे.*
*उत्तर :-* हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत .
अंगठा -आत्मा/
तर्जनी -पितर/
मध्यमा-स्वतः/अनामिका -देव/करंगळी -ऋषी /
म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे...
*१४) समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत.*
*उत्तर :-* विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून......
*१५) अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये.*
*उत्तर :-* पितराना दोष लागतो म्हणून .
*१६) उंब-यावर बसून का शिंकू नये.*
*उत्तर :-* उबरा हा मुळात बसण्यासाठी नाही तेथे सर्वतिर्थे बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकुन घडतो म्हणून..... घडल्यास पाणी शिंपडावे......
*१७) निजलेल्या माणसास का ओलांडून जावू नये.*
*उत्तर :-* झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून ..
*१८) मांजराना प्रेत ओलांडून का देवू नये.*
*उत्तर :-* प्रेत प्रेतच राहते म्हजे पिशाच्च योनित जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून ..
*१९) रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुस-यास का देवू नयेत ?*
*उत्तर :-* याच्यात करणीतत्व आहेत. आकर्षण क्रिया पटकन होते व बळीतत्त्व आहे म्हणून ....
*२०) सायंकाळी केर का काढु नये?*
*उत्तर :-* लक्ष्मीला आवडत नाही .
लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते...
*२१) रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा.*
*उत्तर :-* शव= शिव म्हणून नमस्कार करावा....
*२२) कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे ?*
*उत्तर :-* येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते...
*२३) एका हाताने देवाला नमस्कार का करू नये.*
*उत्तर :-* दश इन्द्रियाचा नमस्कार मह्त्वाचा असतो . पंचतत्त्वाचा नाही ...
*सर्वांना ही माहिती द्या..*
*"कोणाचं घरटं मोडू नका." सत्य घटना* ✍️🙏
*खूप सुंदर लेख*
*टी.एन्.शेषन् भारताचे मुख्यनिवडणूक आयुक्त होते.त्ंच्या जीवनात घडलेला प्रसंग !*
*एकदा ते आपली पत्नी जयलक्ष्मी शेषन् यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले होते.उत्तरप्रदेशातल्या एका सुंदर रस्त्यावरून गाडी जात होती.रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती.वर्दळीचा रस्ता नसल्यामुळे की काय ,पक्ष्यांची अनेक ,सुंदर घरटी झाडांची शोभा वाढवत होती.*
*जयलक्ष्मी यांना हे दृष्य खूप आवडलं .त्यांना वाटायला लागलं आपल्या घराच्या बागेसाठी यातली दोन घरटी नेली ,तर बाग किती शोभून दिसेल.त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.*
*गाड्या थांबल्या.त्यांच्यासाठी जे संरक्षक पोलीस दल होते ,ते इकडे तिकडे शोधायला लागले.तिथे एक मुलगा गुरं चरायला आला होता.त्याला बोलावलं.तो सरकारी इतमाम पाहून कोणीतरी मोठी अधिकारी व्यक्ति आलीय ,हे त्यानी ओळखलंच.त्यांनी मुलाला दोन घरटी काढून आणायला सांगितली ,आणि प्रत्येक घरट्याचे १० रु.देऊ असंही सांगितलं.त्या मुलानं खाली मान घालून नकारार्थी मान हलवली.* *"दहा रुपये कमी वाटतायंत का ,५०रुपये देऊ प्रत्येक घरट्याचे."*
*यावर तो मुलगा म्हणाला ,"सरजी,पैशाचा सवालच नाहीए .कितीही पैसे दिलेत तरी ती घरटी मी झाडावरून उतरवणार नाही."*
*"का रे बाबा?"*
*"त्यात पक्ष्याची पिल्लं शांतपणे आणि विश्वासानी झोपली आहेत.सायंकाळी त्यांची आई चोचीत दाणे घेऊन पिल्लांच्या ओढीनं येईल ,पिल्लं सापडली नाहीत तर ती सैरभैर होईल ,आक्रोश करेल,ते माझ्याच्यानं पाहवणार नाही.कोणाचं घर मोडायचं पाप आहे ना सर जी."*
*हे ऐकून शेषन् व त्यांची पत्नी थक्क झाले.*
*शेषन् म्हणाले ,"कोणीतरी डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं.माझं पद ,माझी पदवी ,उच्च शिक्षण सार्या सार्याचा अभिमान क्षणार्धात गळून पडला ,वितळून गेला.जे शिक्षण , संस्कृती आणि संस्कार या मुलानं निसर्गाकडून शिकलेत.ते शिक्षण कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही.".*
*पद,सत्ता,श्रीमंती,ताकद याचा उपयोग करा दुरुपयोग करू नका. कारण सोबत गरीबावर केलेले उपकार येतात, गरिबांचा शाप हा येणाऱ्या पिढीवर संस्कार घालणारा आणि अधोगती कडे नेणारा असतो.*
*🌷सोशल मिडीयाचा वापर लोकांना प्रभावित करण्यासाठी नाही तर लोकांच्या आचरणात आणि विचारात परिवर्तन करण्यासाठी करा.🌷*🙏🏻
Subscribe to:
Posts (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...