Saturday, 14 August 2021

 राष्ट्रध्वजाच्या योग्य वापरासंदर्भात मार्गदर्शक सूचना

 

             मुंबई दि. 13 : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत 1 जानेवारी 2015 रोजीच्या आदेशानुसार प्लॅस्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन कराव्यात असे सुचित करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर अंधेरी, बोरीवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

            15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे व इतर राष्ट्रीय कार्यक्रम,महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले मैदानात/रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका स्तरावर तहसिल कार्यालयात आणि जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय  संस्था तसेच इतर संघटनाना सुपुर्द करण्यात आले आहेत, असे मुंबई उपनगर उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

0000


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमिताने

आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे प्रश्न मंजुषा स्पर्धा

 

          मुंबई, दि. 13 :- भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्न अमृत महोत्सवानिमित्ताने आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागाने मंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वाच्या बाबीविषयी समाजात औत्स्युक्य निर्माण व्हावेऐतिहासिक स्मृतींना उजाळा मिळावा आणि समाजमनात त्याचे स्थान कायम रहावेया उद्देशाने ज्ञान, प्रबोधनासाठी ही स्पर्धा 16 ऑगस्टपासून आयोजित करण्यात आली आहे.

          या स्पर्धेसाठी आकाशवाणीच्या बातमीपत्रातून दर सोमवारी एक प्रश्न विचारला जाईल. स्पर्धकांनी या प्रश्नाचे उत्तर आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागाकडे ई-मेलद्वारा पाठवायचे आहे. quiz75news@gmail.com या ई-मेलवर स्पर्धकांनी उत्तर पाठवावे सर्वप्रथम योग्य उत्तर देणाऱ्या यशस्वी स्पर्धकाचे नाव शुक्रवारच्या बातमीपत्रातून प्रसारित करण्यात येतील. आकाशवाणीच्या सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्मदरही फोटोसह हे प्रकाशित करण्यात येईल. तसेच प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात येईल.

          या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याच आवाहन आकाशवाणी मुंबईच्या वृत्तविभागप्रमुख सरस्वती कुवळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

0000

Friday, 13 August 2021

 -पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

            मुंबईदि.13:   येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे वाटेल याबद्दल विश्वास वाटतो. राज्यभरात राबविला जाणारा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

            येत्या स्वातंत्र्यदिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे "ई-पीक पाहणी" प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण इलेक्ट्रॉनिक कळ दाबून करण्यात आले. यावेळी  महसूल मंत्री बाळासाहेब थोरातकृषी मंत्री दादाजी भुसेमहसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तारऑनलाईन पध्दतीने कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदममुख्य सचिव सीतराम कुंटे,  महसूलनोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीरमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंहमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेकृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेजमाबंदी आयुक्त व संचालक निरंजन सुधांशूटाटा ट्रस्टचे मुख्य सल्लागार जयंतकुमार बांठियाटाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनाथ नरसिंहनई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगतापयांच्यासह महसूल विभागाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

            मोबाईल ॲपचे ऑनलाईन लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कीकाही वर्षांपूर्वी शेतकऱ्याला स्वत:चा सातबारा पहायला मिळण्यासाठी खूप कष्ट करावे लागत असेपण आज शेतकऱ्यांना आपला सातबारा मोबाईलमध्ये पाहणे शक्य झाले आहे.काळाप्रमाणे बदलणे हा प्रकृतीचा नियम आहे असे आपण म्हणतो मग बदलत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण नवनवीन प्रयोग करुन शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्याबरोबरच त्यांना सोप्या आणि सुलभ पध्दतीने आवश्यक असणारी कागदपत्रे मिळवून देणेपीकांची माहिती मिळवून देणे यावर भर देत आहोत याचा आनंद वाटतो.कोणताही नवीन प्रयोग करताना यश तेव्हाच मिळते जेव्हा आपण सर्वजण सांघिक प्रयत्न करतो. आपण सर्वांनी सांघिक प्रयत्न केल्यानेच आता आपल्या शेतकरी बांधवांचे कष्ट कमी होण्यास मदत होणार आहे.

हमीभाव नाही तर हमखास भाव मिळेल यावरर भर

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले कीआज दररोज हवामानात बदल होतो आहे. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान होते आहे. अशा काळात शासनाला शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देताना अनेक अडचणी येतात कारण त्यावेळी पंचनामे करणे कठीण असते. पण या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिक मदत होणार आहे.ई पीक पाहणी प्रकल्पामुळे शेतकऱ्याचे आयुष्य अधिक सोपे आणि सहज करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचा आनंद आहे. विकेल ते पिकेल ही संकल्पना राज्यभरात राबवित असताना आपापल्या जिल्हयाचे वैशिष्टय ओळखून एक जिल्हा एक पीक असा ब्रॅड तयार करणे आवश्यक आहे तरच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळेल. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला अधिक दिवस कसा टिकवता येईल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी शेतीमध्ये काळाच्या पुढे जाणारे प्रयत्न केले तसेच आताही शेतकऱ्यांना नवीन गोष्टी आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्यांचे जीवन सोपे आणि सुलभ करण्यावर भर देणे आवश्यक आहे. 

 

ई पीक पाहणी प्रकल्प प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा

-- बाळासाहेब थोरात

            महसूलमंत्री श्री. बाळासाहेब थोरात म्हणाले कीमहाराष्ट्रात राबविण्यात येणारा हा पथदर्शी प्रकल्प असून आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे.  ई पीक पाहणी प्रकल्प हा प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा प्रकल्प आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे स्वरुप जरी मर्यादित स्वरुपातले असले तरी याचा होणारा परिणाम हा व्यापक स्वरुपातील आहे.टाटा ट्रस्ट मार्फत सुरुवातीला हा प्रकल्प अवघ्या दोन जिल्हयात पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरु करण्यात आला होता मात्र आता हा प्रकल्प राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होणार आहे. आताच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना सहजपारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असून यापुढील काळातही हा विभाग लोकाभिमुख करताना सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात पुढे राहील. आज लोकार्पण करण्यात आलेल्या प्रकल्पाची राज्यस्तरावर अंमलबजावणी होणार आहे. तसेच पुढील 15 दिवसात राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या पीकाची नोंद ॲपवर कशी करायची याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.ऑनलाईन सातबारामध्ये सुलभता आणण्याबरोरबच आता 8 अ सुध्दा ऑनलाईन करण्यात आला आहे.

            कृषी मंत्री श्री.भुसे म्हणाले कीई- पीक पाहणी प्रकल्प महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात राबविण्यात येणार असून विकेल ते पिकेल या अभियानाद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प असणार आहे. शेतकऱ्याला स्वत: पिकांची नोंद करता येणार असून शेतीसाठी पीक कर्ज आणि पीक विमा सुलभरित्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले कीशेतकऱ्यांना स्वत:च्या शेतातील पिकांची सात बारामध्ये स्वत: नोंद करता येणार असल्याने पीक पेरणी आणि पिकांच्या परिस्थितीचा अंदाज करता येणार आहे. ई पीक पाहणी प्रकल्पामुळे गावतालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजणारआहे.

            "ई-पीक पाहणी" प्रकल्पाचा राज्यव्यापी प्रत्यक्ष वापराचा शुभारंभ कार्यक्रम फेसबुकयूटयूब आणि ट्विटर या समाजमाध्यमांवर लाईव्ह प्रसारीत करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान या प्रकल्पासाठी मेहनत घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमहसूल मंत्री बाळासाहेब थोरातकृषी मंत्री दादाजी  भुसेमहसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.

            महसूलमुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आभार मानले.

 स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिन सोहळ्याची

मंत्रालयात रंगीत तालीम

 

          मुंबई, दि. 13 : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट 2021 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम उपसचिव तथा सह मुख्य राजशिष्टाचार अधिकारी उमेश मदन यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात झाली.

          कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता ब्रेक दी चेनअंतर्गत शासनाने निर्देशित केलेल्या नियमानुसार गतवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम साजरा करताना कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावीअसे निर्देश सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात आले आहेत.

          राजशिष्टाचार विभागाचे कक्ष अधिकारी सुधीर निखाळे, युवराज सोरेगांवकरराजशिष्टाचार अधिकारी भरत जैनअतिरिक्त पोलीस आयुक्त श्री.सिंघल, पोलीस उपायुक्त (मंत्रालय सुरक्षा) दीपक साकोरेपोलीस उपायुक्त निमित गोयल, पोलीस उपायुक्त श्री.मीना, पोलीस उपायुक्त (परिवहन) योगेश कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

00000

 


 राज्यात २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान सामाजिक ऐक्य पंधरवडा

- अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

·        २० ऑगस्ट रोजी साजरा होणार सद्भावना दिवस

 

            मुंबईदि. 12 : राज्यात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा जयंतीदिन २० ऑगस्ट हा "सद्भावना दिवस" म्हणून तर २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ हा पंधरवडा "सामाजिक ऐक्य पंधरवडा" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकाविषयी ऐक्याची भावनासौहार्दभाव वृध्दींगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे हा पंधरवडा साजरा करण्यामागे आहेतअशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

            कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करुन सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे व राज्यातील तसेच देशातील सामाजिक ऐक्यसौहार्दसद्भावना वाढीस लागण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावाअसे आवाहन श्री. मलिक यांनी केले. केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय यांच्या निर्देशानुसार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा जयंती दिवस २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी "सद्भावना दिवस" म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या निर्देशास अनुसरुन "सामाजिक ऐक्य पंधरवडा" साजरा करण्यात येणार आहे.

            याअनुषंगाने शासन परिपत्रकाद्वारे विविध सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रालयाच्या प्रांगणात सामाजिक अंतरविषयक नियमांचे पालन करून सद्भावना दिवस साजरा करण्यात यावासर्व उपस्थितांना सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्यास सांगण्यात यावे. महसूल विभागाच्या आयुक्तजिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातून ऑनलाईनलाऊड स्पिकरमार्फत सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. कर्मचाऱ्यांनीअधिकाऱ्यांनी जागेवर उभे राहून किंवा प्रांगणात सामाजिक अंतरविषयक नियमांचे पालन करून सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घ्यावी. यावर्षी सद्भावना शर्यत आयोजित करू नये. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहाता यावा यासाठी वेबसाईटव्दारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करावे. बृहन्मुंबईत लोकांच्या विशेषतः युवकांच्या सहभागाने सांस्कृतिक कार्य संचालक यांनी सद्भावना या विषयावर वेबिनार इत्यादीव्दारा संवादमार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावेत. विद्यापीठेमहाविद्यालये आणि शाळा बंद असल्याने तेथे यावर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीतअशा सूचना देण्यात आल्या आहेत. सामाजिक ऐक्य पंधरवडा" साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मुख्यालयात सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसृत करण्यासाठी वेबिनार इत्यादीव्दारा संवादमार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावेत. या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील प्रख्यात स्वातंत्र्य सैनिकांना भाषण देण्यासाठी निमंत्रित करावे. सांस्कृतिक कार्य संचालक यांनी पंधरवड्यामध्ये वेबिनार इत्यादीव्दारा संवादमार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेतअसे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

 जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त

पर्यटन संचालनालयामार्फत फोटोग्राफी स्पर्धा

·       फूड फोटोग्राफीट्रॅव्हल फोटोग्राफीकथाकथन यावर ऑनलाईन कार्यशाळा

 

               मुंबईदि. 12 : जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त (19 ऑगस्ट) नवोदित आशय निर्मात्यांना एकत्र आणण्यासाठी आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने (DoT) एक आठवडाभर चालणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये फोटोग्राफी स्पर्धाहेरिटेज वॉकफूड फोटोग्राफीट्रॅव्हल फोटोग्राफी आणि कथाकथन यावर आधारित ऑनलाईन कार्यशाळा असतीलअशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.

               महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने 11 ऑगस्ट 2021 पासून इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर #MaharashtraThroughMyLens ही फोटोग्राफी स्पर्धा जाहीर केली आहे. यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या पर्यटनाशी निगडीत कुठलाही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर किंवा फेसबूक वॉलवर #MaharashtraThroughMyLens या हॅशटॅगसह तसेच महाराष्ट्र टूरिझमच्या अधिकृत हँडलला   (www.facebook.com/maharashtratourismofficial आणि www.instagram.com/maharashtratourismofficialटॅग करून या स्पर्धेत प्रवेश नोंदवू शकता. फोटो अपलोड करताना तो वन्यजीवलँडस्केपसाहसनिसर्गग्रामीण आणि शहरी जीवनवारसासंस्कृतीखाद्य इत्यादी पुरताच मर्यादित असावा असे नाही. यामध्ये आपण आपली कल्पकता वापरू शकताअसे डॉ. सावळकर यांनी सांगितले.

               स्पर्धकाच्या फोटोग्राफीची अभिनव शैलीफ्रेमिंगकॉम्पोझिशनएडिटिंग स्किल्स आणि सोशल मीडियावरील त्यांच्या फोटोला मिळालेला प्रतिसाद हे निकष विचारात घेऊन विजेत्यांची निवड केली जाईल. 19 ऑगस्ट 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने निकाल घोषित केले जातील. प्रथम पुरस्कार 25 हजार रुपयेद्वितीय पुरस्कार 10 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 5 हजार रुपये याप्रमाणे बक्षीसे दिली जातील. त्याचबरोबर इतर निवड झालेल्या 20 स्पर्धकांना प्रत्येकी  1 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

               याच उपक्रमातील दुसऱ्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील हेरीटेज वॉक असेल. यामध्ये वरिष्ठ छायाचित्रकारासोबत उत्साही २० छायाचित्रकारांना हेरीटेज वॉकची संधी मिळेल. हा हेरिटेज वॉक 19 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत असेल. हेरीटेज वॉकच्या माध्यमातून विविध वारसा इमारतींना भेट देण्याची आणि वेगवेगळ्या दृष्टीकोनातून छायाचित्रे टिपण्याची संधी मिळेल. ही छायाचित्रे  #MaharashtraThroughMyLens या हॅशटॅगसह महाराष्ट्र पर्यटनच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सला टॅग करुन सोशल मीडियावर अपलोड करण्यात येतील. जागतिक छायाचित्रण दिनी 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी महाराष्ट्र पर्यटनच्या इन्स्टाग्राम हँडलवर (www.instagram.com/maharashtratourismofficialऑनलाईन कार्यशाळा होईल. कार्यशाळेत त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींकडून नव्याने या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना फूड फोटोग्राफीट्रॅव्हल फोटोग्राफीकथाकथन यावर आधारित मार्गदर्शन केले जाईल. या इंस्टाग्राम ऑनलाइन कार्यशाळा प्रत्येकी ३० मिनिटांच्या असतील. 

महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल

               यासंदर्भात पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह म्हणाल्या कीपर्यटनातील प्रत्येक नवीन उपक्रमासह आम्ही लोकांच्या जवळ जात आहोत. आम्ही यापूर्वी फोटोग्राफी स्पर्धा घेतल्या आहेत. परंतु यावेळची थीम थोडी वेगळी आहे. यामध्ये कुठलीही विशिष्ट थीम न घेताकल्पकतेला वाव देततुमच्या मनातील महाराष्ट्र टिपायचा आहे. यानिमित्ताने स्वतःच्या नजरेतून वेगळा महाराष्ट्र टिपलेल्या नवोदित छायाचित्रकारांसाठी संधी निर्माण झाल्या आहेत. मुंबई तिच्या धावपळीच्या आणि रात्रीच्या जीवनासाठी ओळखली जाते. त्यात भर घालत महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने हेरिटेज वॉकसारखे उपक्रम सुरू करून हेरिटेजच्या पैलुलासुद्धा महत्त्व देत आहोत. मुंबईमध्ये अनेक वारसास्थळे आहेतहेरिटेज वॉकद्वारे या स्थळांना भेट दिली जाईल. अशा उपक्रमांमधून महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला चालना मिळेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

               पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर म्हणाले कीछायाचित्रण हे पूर्वीसारखे अवघड न राहता आता सोपे झाले असले तरी त्यातील बारकावेकौशल्येप्रकाशयोजनाफोटोग्राफीची व्हिजन इत्यादी गोष्टी योग्य मार्गदर्शनाने साध्य करता येऊ शकतील. जागतिक फोटोग्राफी दिनाच्या औचित्याने होत असलेले फोटोग्राफीचे विविध उपक्रम हे नवोदित छायाचित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आहेत. यानिमित्ताने आयोजित होणारे विविध उपक्रम हे ज्ञान प्रदान करतीलचपण त्याचसोबत फोटो काढताना विचारात घेतल्या जाणाऱ्या कोनप्रकाशयोजन  इत्यादी विविध पैलूंचा दृष्टीकोनही प्रदान करतील. शिवाय यानिमित्ताने महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे नव्याने जगासमोर येतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

००००

 सामाजिक न्याय विभागाच्या आर्थिक तरतुदीचे नियोजनखर्चयोजनांची

अंमलबजावणी व मूल्यमापन प्रभावीपणे होण्यासाठी कायदा करणार

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

·       यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बार्टीमार्फत उभारण्यात येणार पंचतारांकित अभ्यास केंद्र

 

            मुंबई, दि. 12 : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाला मागासवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विविध योजनांसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी प्राप्त होत असतो या निधीचा विनियोग नियोजनबद्धरित्या करून प्रत्येक गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळेल यासाठी प्रत्येक योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व मूल्यमापन करता यावे यासाठी तेलंगणा राज्याच्या धर्तीवर बजेट अंमलबजावणीचा कायदा करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

            सामाजिक न्याय विभाग व संविधान फाऊंडेशन यांसह अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या संघटना व पदाधिकाऱ्यांची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली.

            बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमारसमाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरेबार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये तसेच संविधान फाऊंडेशनचे ई झेड खोब्रागडे (सेवानिवृत्त सनदी अधिकारी)डॉ. बबन जोगदंडअतुल भातकुलेमहेंद्र मेश्रामसिद्धार्थ भरणेदीपक निरंजनअतुल खोब्रागडे यांसह विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

            सामाजिक न्याय मंत्री श्री.धनंजय मुंडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे (बार्टी) मार्फत यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे मार्गदर्शन मिळावे यासाठी पंचतारांकित अभ्यास केंद्र पुणे येथे उभारण्याचे विचाराधीन असून यासाठी जागा उपलब्धतेनुसार आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अभिमत विद्यापीठामध्ये (Deemed University) शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या प्रचलित शिक्षणशुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या धर्तीवर लाभ देण्यात यावाया मागणीबाबत राज्य शासन सकारात्मक असून असल्याचेही श्री.मुंडे यांनी सांगितले.

संविधान सभागृह...

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत संविधान सभागृह बांधण्यासाठी मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्याचे आराखडे विभागाला प्राप्त झाले असल्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे म्हणाले. 

सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजनेला ब्रेक लागणार नाही

            कोविड-19 च्या कठीण काळात राज्य सरकारवर प्रचंड आर्थिक ताण असताना देखील मागील वर्षी सामाजिक न्याय विभागाने प्राप्त निधींपैकी 99% पेक्षा अधिक निधी खर्च केला. या आर्थिक वर्षात देखील विभागाच्या कोणत्याही योजनेला ब्रेक लागणार नाही किंवा कोणत्याही योजनेचा पैसे इतरत्र वळवला जाणार नाहीअशी ग्वाही श्री. मुंडे यांनी दिली.

            दि. 08 मार्च 2020 रोजी संविधान फाऊंडेशनच्या विविध मागण्यांविषयी खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपस्थित केलेल्या विविध मागण्यांवर देखील या बैठकीत चर्चा झाली.

००००

 यंदा शैक्षणिक फीमध्ये 15 टक्के कपात करण्याचा

शासन निर्णय जाहीर

 

            मुंबईदि. 12 : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फी मध्ये १५ टक्के कपात करण्यात यावी. असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी एक वेळेची बाब म्हणून सर्व मंडळांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना त्याप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.

           राज्यात देखील बहुतांश भागात मार्च२०२० पासून ब-याच कालावधीसाठी शाळा बंद असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे, यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनी देखील काही शैक्षणिक सुविधांचा वापर केलेला नाही व यामुळे शैक्षणिक संस्थांच्या खर्चात देखील काही प्रमाणात बचत झाली आहे. या पार्श्वभूमीवर व सर्वोच्च न्यायालयाने पारीत केलेले आदेश विचारात घेवून निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय

·      सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फी मध्ये १५ टक्के कपात करण्यात यावी.

·      यापूर्वी ज्या पालकांनी पूर्ण फी भरली आहेअशी अतिरीक्त फी पुढील महिन्यात किंवा तिमाही हप्त्यात किंवा पुढील वर्षी शाळा व्यवस्थापनाने समायोजित करावी किंवा याप्रमाणे फी समायोजित करणे शक्य नसल्यास फी परत करावी.

·      कपात करण्यात आलेल्या फीबाबत विवाद निर्माण झाल्यास असा विवाद यथास्थिती संबंधित विभागीय शुल्क नियामक समितीकडे किंवा शासन निर्णय क्र. तक्रार-२०२०/ प्र.क्र.५०/एस.डी-४,दिनांक २६ फेब्रुवारी २०२० अन्वये गठीत विभागीय तक्रार निवारण समितीकडे दाखल करण्यात यावा व याबाबत विभागीय शुल्क नियामक समितीने किंवा विभागीय तक्रार निवारण समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहील.

·      कोव्हीड-१९ महामारीच्या काळात विद्यार्थ्याने शाळेची फीथकीत फी भरली नाही म्हणून शाळा व्यवस्थापनाने अशा कोणत्याही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यास किंवा परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करण्यात येऊ नये किंवा अशा विद्यार्थ्यांचा निकाल देखील रोखून धरण्यात येऊ नये.

·      हे आदेश सर्व मंडळाच्यासर्व माध्यमाच्या शाळांना लागू राहतील.

·      हे आदेश तात्काळ परिणामाने अमलात येतील.

·    शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०८१२१९५५०१०८२१ असा आहे.

००००

Featured post

Lakshvedhi