Tuesday, 3 August 2021

 क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

 

स्वातंत्र्यलढ्यासह देशाच्या जडणघडणीतील

क्रांतीसिंहांचे योगदान प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी

 -उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. 3: इंग्रजांच्या राजवटीत दीड हजार गावात प्रतिसरकार चालविणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले. स्वातंत्र्य लढ्यासह देशाच्या जडणघडणीततसेच बहुजन समाजाच्या कल्याणासाठी क्रांतीसिहांनी केलेले कार्य अलौकिक असून त्यांचे कार्य प्रत्येक भारतीयाला कायम प्रेरणा देत राहीलअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

            क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतातमहात्मा गांधीजींनी सुरु केलेल्या असहकार चळवळीतील सहभागासह प्रतिसरकारच्या आंदोलनापर्यंत क्रांतीसिंहांनी केलेले कार्य देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविले आहे. प्रतिसरकारच्या माध्यमातून त्यांनी लोक न्यायालयेबाजार व्यवस्थाअन्नधान्य पुरवठ्यासाठी पर्यायी यंत्रणा निर्माण केली होती. गावगुंडसमाजकंटकांवर वचक निर्माण केला होता. इंग्रज सरकार विरोधातले हे फार मोठे धाडस होतं. स्वातंत्र्य लढ्याबरोबरच त्यांनी देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. शिक्षणप्रसारव्यसनमुक्तीअंधश्रद्धा निर्मुलनअनिष्ठ रुढी-परंपरांवर बंदी यासाठी प्रबोधनाचे कार्य केले. स्वातंत्र्यलढ्यानंतरही देशाच्या जडणघडणीसाठी क्रांतीसिंहांनी आपले आयुष्य वेचलेत्यांचे कार्य प्रत्येक भारतीयाला कायमच प्रेरणादायी ठरेलअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन केले आहे.

0000

 [02/08, 22:49] Baby: 🙏*दैव आणि कर्म*🙏


      आमच्या गल्लीत एक ,दुकानदार आहे. 

        मी त्याच्या दुकानावर गेलो व त्याला विचारले कि बाबा रे! मला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचे उत्तर देवू शकतोस का? 

तो म्हणाला तुम्ही खुशाल विचारा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.

         मी विचारले कि माणुुस मेहनत करतो, मग त्याला यश मिळाले,.कि तो म्हणतो हे देवाने यश पदरात टाकले. 

मला सांग दैव श्रेष्ठ कि मेहनत?

         मला वाटले कि याची पुरती बोलती बंद होणार, पण त्याने जे उत्तर दिले ते एकुन मी अवाक झालो. 

   .   बोलती बंद त्याची नाही तर माझीच बोलती बंद झाली.

           त्याने उत्तर दिले, तो म्हणाला, मला सांगा तुमचे बँकेत सेफ डिपॉजीट चे लॉकर आहे? त्या लॉकरला दोन चाव्या असतात. एक तुमच्याकडे आणि एक बँक मँनेजर कडे. लॉकर उघडतानां त्या दोन्ही चाव्या लॉकर ला लावाव्या लागतात. तरच तो लॉकर उघडते अन्यथा नाही.बरोबर ना? मी म्हणालो बरोबर, पण याचा मी विचारलेल्या प्रश्नाचा काम संबंध?

            तो म्हणाला जसे बँक लॉकरला दोन चाव्या असतात, तश्याच आपल्या मानवास नियतीने दोन चाव्या दिल्या. एक मेहनतची चावी, ती आपल्या पाशी असते. तर दुसरी नशीब (दैव) चावी ही त्या परमेश्वरा पाशी असते. 

          आपण आपली चावी यशाच्या लॉकरला लावून द्यायची, जेव्हा परमेश्वर त्याकडची चावी यशाच्या लॉकरला लावेल, तेव्हाच आपले यशाचे लॉकर उघडेल अन्यथा नाही.

          यशा साठी मेहनत व नशीब या दोन्ही चाव्या आवश्यक आहे. त्या शिवाय यशाचे द्वार उघडणार नाही.

मानवाने मेहनत करता करता त्या परमेश्वराचे सतत नामस्मरण करत राहावे. तरच त्याला यश मिळेल, अन्यथा नाही. नुसती मेहनत करूनही उपयोग नाही व नुसती भक्ती करुन ही उपयोग नाही.

         *यश मिळवण्यासाठी मेहनत व भक्ति दोन्ही आवश्यक आहे.*


 🌺🌺🙏🙏

[03/08, 08:05] Baby: *नापासांची घटत चाललेली टक्केवारी चिंताजनक आहे...*


*देश चालवणार कोण ?*


😃😃🤣😄😀🤣

 *साथरोग नियंत्रणासाठी चिपळूण मध्ये पाच फिरते दवाखाने*

जगद्गुरु नरेंद्र चार्य महाराज संस्थानाचा लोकोपयोगी उपक्रम,शहरात साफसफाई देखील सुरूच.

क्षेत्र नाणीज धाम जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानातर्फे शनिवारपासून पाच फिरते दवाखाने सुरु करण्यात आले. संस्थानाच्या रुग्णवाहिका रूपांतरण दवाखान्यात करण्यात आले आहे. ते वेगवेगळ्या या ठिकाणी जाऊन उपचार करतील तसेच चिपळूण व परिसरातील वाड्या-वस्त्यांवर सुद्धा त्यांचा उपयोग होणार आहे.

महापुरानंतर चिपळूणची परिस्थिती अद्याप गंभीर आहे .गाळ, साचलेले पाणी, डास आदींमुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. संस्थानाच्या फिरत्या दवाखान्याची सोय केली आहे त्यामध्ये डॉक्टर्स , नर्स,पुरेसा औषध साठा आहे वाड्या वस्त्यांवर जाऊन गरिबांवर मोफत उपचार होणार आहेत.

 [03/08, 08:56] Baby: *नागपूर हिवाळी अधिवेशनातील दुपारच्या सत्रात प्रचंड गोंधळ झाला....*


*२८८ आमदारांपैकी २८७ आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली.फाईल्स फेकून दिल्या सभागृहाचे कामकाज चालूच दिलं नाही.गोंधळ घालणारया आमदारांनी सभागृहाची दयनीय अवस्था करून टाकली...*


*२८७ आमदार सभागृहाच्या बाहेर निघून गेले.त्या सभागृहात फक्त एकच आमदार होते ते म्हणजे आदरणीय #गणपतराव_देशमुख....*


*गणपतराव देशमुख सभागृहात मान खाली घालून दोन्ही हात डोक्याला लावून चिंताग्रस्त अवस्थेत बसलेले....*


*दुसऱ्या दिवशी #इंडियन_एक्सप्रेस या वर्तमानपत्रा मध्ये डोक्याला दोन्ही हात लावून बसलेल्या गणपतराव(आबा) देशमुखांचा फोटो छापून आला ती बातमी व फोटो पाहून लोकांना एक विलक्षण धक्का बसला....*


*२८७आमदारांनी अधिवेशनात गोंधळ का घातला असेल...?*


*महाराष्ट्रातील जनतेला वाटलं गरीबाच्या पुनर्वसनाचा अथवा या पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेच्या लोकहितासाठी गोंधळ घातला गेला असेल ?*


*पण जेव्हा लोकांना कळलं की फायली भिरकावत कालचा गोंधळ हा #आमदारांची_पेन्शन_वाढ_करावी म्हणून घातला गेला होता....*


*त्या सभागृहात डोक्याला हात लावून बसलेले एकमेव आमदार गणपतराव देशमुख (आबा ) यांना पेन्शन वाढ नको होती....*


*नंतर पत्रकारांनी गणपतराव ( आबा ) देशमुख यांना विचारले तुम्हाला पेन्शन वाढ का नको आहे....?*


*पत्रकारांच्या ह्या प्रश्नाचे उत्तर देतेवेळी गणपतराव देशमुख यांनी सांगितले की....*


*महाराष्ट्रातील बहुतांश जनता ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही गरीब  हे आणखीनच गरीबच होत चाललेत.त्यांना रहायला घरे नाहीत.महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत....*


*आपल्याला लोकांनी विकासकामं करण्यासाठी निवडून दिले आहे स्वतःची पेंन्शन वाढ करून घेण्यासाठी नव्हे....!*


*इतका गोंधळ होऊन देखील तिसऱ्या दिवशी पेन्शनवाढ मंजूर झाली........*😢


*कारण सभागृहात सर्वच नेते गणपतराव ( आबा ) देशमुख नव्हते....!*


*घरातून बाहेर पडल्यानंतर घरासमोर उभारून मिळेल त्या एस.टी.बसने प्रवास सुरू करून मतदारसंघ पिंजून काढणारे व मंत्रीपद जाताच क्षणी सरकारी गाडीचा त्याग करणारे तसेच जमिनीशी जोडली गेलेली नाळ तुटू न देणारे आदरणीय गणपतराव ( आबा ) देशमुख यांना....*


*_भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन !_*

     🌹🙏🌹

[03/08, 10:01] Baby: *आयुष्यात सुंदर क्षणांची वाट पाहण्यात  वेळ दड़वु नका,* *जो क्षण आयुष्यात  येईल त्याला  सुंदर करण्याचा प्रयत्न करा..*  *जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे,,,*

*कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते,,,* *आणि कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान असतो.....*

 🙏🌹* *शुभ दिन **🌹🙏

 टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या उंच उडीचा हा अंतिम सामना होता.  अंतिम फेरीत इटलीच्या *जियानमार्को टँपबेरी* चा सामना कतारच्या *मुताजएस्सा बार्शीम* शी होता.  दोघांनी 2.37 मीटर उडी मारली आणि बरोबरीवर होते!  त्यामुळे ऑलिम्पिक अधिकार्‍यांनी नियमानुसार प्रत्येकाला आणखी तीन प्रयत्न करायला सांगितले, परंतु त्यात ते दोघेही 2.37 मीटरपेक्षा जास्त गाठू शकले नाहीत.


 त्या दोघांना आणखी एक अतिरिक्त संधी देण्यात आली, पण पायाच्या गंभीर दुखापतीमुळे *टँपबेरी* ने शेवटच्या प्रयत्नातून माघार घेतली.  आता खरं तर *बार्शीम* समोर दुसरा विरोधक नव्हता, तो क्षण जेव्हा तो एकटा सुवर्ण पदकाचा मानकरी उरला होता!


 पण *बार्शीम* ने अधिकाऱ्याला विचारले "जर मी सुद्धा शेवटच्या प्रयत्नातून माघार घेतली तर काय होऊ शकते का?"  अधिकारी सर्व नियम  तपासतो आणि म्हणतो "मग अश्यावेळी सुवर्णपदक तुमच्या दोघांमध्ये वाटले जाईल".  त्यानंतर *बार्शीम* ने क्षणाचाही विलंब न करता शेवटच्या प्रयत्नातून माघार घेण्याची घोषणा केली.


 हे पाहून इटालियन प्रतिस्पर्धी *टँपबेरी* धावला आणि *बार्शीम* ला मिठी मारली आणि त्याला अतीहर्षामुळे रडू कोसळले!  

.... खेळाच्या अत्युच्च प्रकारात एका माणुसकीची, विश्वबंधुत्वाची ही झलक हृदयस्पर्शी आहे. खेळभावना आणि प्रेम याचा हा अद्भुत संगम हेच ऑलिम्पिक च्या जागतिक आयोजनाचे उद्दिष्ट परिपूर्ण साध्य झाले असे म्हणता येईल.

*तुला मनापासून सलाम बार्शीम.  तू मनं जिंकलीस लेका! ... म्हणजेच जग जिंकलास.*

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

 महापारेषण कंपनीकडून नागपूर जिल्ह्यातील

कोरोना उपाययोजनांसाठी २ कोटींचा निधी

·       ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून धनादेश सुपूर्द

·       मे महिन्यापासून आतापर्यत १८ कोटी निधीची उपलब्धता

 

            नागपूर, दि. २ : नागपूर जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील विविध उपाययोजनांसाठी ऊर्जा विभागाच्या महापारेषण कंपनीकडून दोन कोटींचा सामाजिक उत्तरदायित्व निधी ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला.

            जिल्हाधिकारी आर. विमला यांच्याकडे ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी हा धनादेश दिला. यावेळी महापारेषणचे नागपूर झोनचे मुख्य अभियंता महेंद्र वाळकेनागपूर स्थापत्यचे अधीक्षक अभियंता अविनाश कजबेकरसहाय्यक महाव्यवस्थापक अभय रोहीकार्यकारी अभियंता स्थापत्य प्रवीण दामकेअतिरिक्त कार्यकारी अभियंता विलास रंगारीनिवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे उपस्थित होते.

            उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर कोरोना संदर्भातील वैद्यकीय उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना सामाजिक उत्तरदायित्व निधीसाठी मागणी करण्यात आली होती. यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी विविध संस्था व औद्योगिक कंपन्यांना पत्र दिली होती. या संदर्भात पाठपुरावा करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भातील उपाययोजना करतांना ग्रामीण व शहरी भागात समपातळीवर पायाभूत सोयीसुविधा निर्माण व्हाव्यातअशी अपेक्षा व्यक्त केली.

            जिल्ह्यामध्ये गेल्या मे महिन्यापासून आत्तापर्यंत 18 कोटी रुपये सामाजिक उत्तरदायित्व निधीमध्ये मिळाले आहेत. यातून कोरोनासंदर्भातील पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. कोरोना प्रतिबंधतपासणीउपचार यासाठी तात्काळ प्रतिसाद मिळणारी यंत्रणा जिल्ह्यात उभारण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, असे ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी सांगितले.

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती करिता अर्ज करावेत

 

            मुंबईदि. २ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई शहर - उपनगर जिल्ह्यात 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

       मुंबई शहर - उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील मांगमातंगमिनी मादीगमादींगदानखणी मांगमांग महाशीमदारीराधेमांगमांग गारुडीमांग गारोडीमादगीमादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेवून व सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी,१२ वीपदवीपदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६०% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

         ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ०३ ते ०५ विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखलारेशनकार्डआधार कार्ड शाळेचा दाखला मार्कशीट २ फोटो पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा यासह दोन प्रतित पुर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह आपला अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या)मुंबई- गृहनिर्माणभवनकलानगरतळमजलारूम नं. ३३. बांद्रा (पू)मुंबई ४०००५१ या पत्त्यावर १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत पाठवावाअसे जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय मुंबई शहर उपनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Featured post

Lakshvedhi