Tuesday, 3 August 2021

 क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

 

स्वातंत्र्यलढ्यासह देशाच्या जडणघडणीतील

क्रांतीसिंहांचे योगदान प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी

 -उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. 3: इंग्रजांच्या राजवटीत दीड हजार गावात प्रतिसरकार चालविणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले. स्वातंत्र्य लढ्यासह देशाच्या जडणघडणीततसेच बहुजन समाजाच्या कल्याणासाठी क्रांतीसिहांनी केलेले कार्य अलौकिक असून त्यांचे कार्य प्रत्येक भारतीयाला कायम प्रेरणा देत राहीलअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

            क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतातमहात्मा गांधीजींनी सुरु केलेल्या असहकार चळवळीतील सहभागासह प्रतिसरकारच्या आंदोलनापर्यंत क्रांतीसिंहांनी केलेले कार्य देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविले आहे. प्रतिसरकारच्या माध्यमातून त्यांनी लोक न्यायालयेबाजार व्यवस्थाअन्नधान्य पुरवठ्यासाठी पर्यायी यंत्रणा निर्माण केली होती. गावगुंडसमाजकंटकांवर वचक निर्माण केला होता. इंग्रज सरकार विरोधातले हे फार मोठे धाडस होतं. स्वातंत्र्य लढ्याबरोबरच त्यांनी देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. शिक्षणप्रसारव्यसनमुक्तीअंधश्रद्धा निर्मुलनअनिष्ठ रुढी-परंपरांवर बंदी यासाठी प्रबोधनाचे कार्य केले. स्वातंत्र्यलढ्यानंतरही देशाच्या जडणघडणीसाठी क्रांतीसिंहांनी आपले आयुष्य वेचलेत्यांचे कार्य प्रत्येक भारतीयाला कायमच प्रेरणादायी ठरेलअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi