Friday, 30 July 2021

 50 पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी संस्थांना

सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे

वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी

 

       मुंबईदि. 30 : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळणे आवश्यक असल्याने सहकारी संस्थांना वार्षिक सर्व धारण सभा  ऑनलाईन घेण्यास परवानगी देण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करुन आता 50 पेक्षा कमी सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांना सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी असल्याचे आदेश सहकार विभागाने निर्गमित केले आहेत.

            तसेच 50 पेक्षा जास्त सभासद संख्या असलेल्या सर्व सहकारी संस्थांनी व्हीसी अथवा ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे.  संस्थेच्या प्रत्येक सभासदास वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांकवेळठिकाण व ऑनलाईन लिंक याबाबतची माहिती किमान सात दिवस अगोदर एसएमएस,मेलवॉटसअॅपद्वारे कळविण्यात यावे.

            वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस संस्थेच्या नोटीस बोर्डवरसंस्थेच्या शाखांची कार्यालये या ठिकाणी लावण्यात यावीत. तसेच  ज्या सभासदांचे ईमेलपत्ता किंवा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक नसेल अशा सभासदांना बैठकीत चर्चेसाठी असणा-या विषयाबाबतची माहिती सात दिवसात पत्राद्वारे पोहोच करावी. सर्व सहकारी संस्थांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबतच्या माहितीची जाहिरात संस्थेचे कार्यक्षेत्र विचारात घेवूनकिमान एक स्थानिक वर्तमानपत्रएक जिल्हा वर्तमानपत्र किंवा राज्य दर्जा असलेल्या मराठी किंवा इंग्रजी वर्तमानपत्रात यावी.

वर्तमानपत्रात जाहिरात देताना त्यामध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात यावा

·       वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी व्हीसी किवा ओएव्हिएम (Other Audio Visual Means) यापैकी कोणत्या माध्यमाद्वारे घेण्यात येणार आहे.

·       सभेचा दिनांक व वेळ.

·       ज्या सभासदांनी आपला ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक याबाबतची माहिती संबंधित सहकारी संस्थेकडे नोंद केली नसेल त्याबाबतची माहिती कोठे सादर करावी याबाबतचा तपशील नमूद करावा.

            सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा या व्हीसी किंवा ओएव्हिएम (Other Audio Visual Means) द्वारे घेण्यासाठी संबंधित सहकारी संस्थेने त्यांच्याकडे उपलब्ध असणा-या तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने अथवा एजन्सीची निवड करून त्यांच्यामार्फत सभेचे कामकाज पार पाडावे. तसेच एजन्सीची निवड करताना मराठी सॉफ्टवेअर वापरणा-या एजन्सीचा प्राधान्याने विचार करावावार्षिक सर्वसाधारण सभेस सदस्यांच्या उपस्थितीबाबत योग्य नोंद ठेवून सभेबाबतचे अभिलेख प्रचलीत तरतूदीनुसार जतन करावे. या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून संस्थांनी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची कार्यवाही तात्काळ करावी. हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

 आता शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी

महसूल विभागाचा ई पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्टपासून राज्यभर

 महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

 

·        रियल टाइम नोंदणीमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना अचूक नुकसान भरपाई आणि मदत देणे शक्य होणार

·        टाटा ट्रस्टच्या साहाय्याने अप्लिकेशनची निर्मिती

 

            मुंबई, दि. 30 : शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनशेत जमिनीची प्रतवारीदुष्काळअतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. मात्र दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होताआता महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाईम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र ॲप्लिकेशन निर्मिती केली असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

            टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ॲप्लिकेशनचीनिर्मिती करण्यात आली आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतीलतलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील.

            यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती अप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे. तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे.पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईलअसेही श्री. थोरात यांनी सांगितले.

            ई पीक पाहणीमुळे राज्यातील पिकांचे अचूक क्षेत्र कळणार आहेत्यामुळे राज्यातील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे.ई पीक नोंदणी प्रकल्प यापूर्वी प्रायोगिक तत्वावर वीस तालुक्यात राबवण्यात आला होता. त्याला मिळालेल्या यशानंतर हा राज्यभर राबविण्याचा निर्णय महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला. त्यासंदर्भाने राज्य सरकारने शासन आदेश जारी केला आहे.

            शिवाय ई पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, विभागीय जिल्हा स्तरीय आणि तालुकास्तरीय सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

याशिवाय पूर्ण वेळ प्रकल्प अंमलबजावणी कक्ष संचालक भूमी अभिलेखपुणे यांच्या नियंत्रणाखाली सुरू करण्यात आला आहे.

००००


 कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल

 राज्यपालांच्या हस्ते 27 जैन संघटनांचा सत्कार

 

            मुंबई, दि. 30 : कोरोना काळात मानवसेवा तसेच जीवदयेचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बोरीवली मुंबई येथील 27 जैन संघटनांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे शुक्रवारी (दि.30कोरोना योद्धा’ सन्मान करण्यात आला.

            कार्यक्रमाला बोरिवलीचे आमदार सुनील राणेजैन संघांचे समन्वयक स्नेहल शाहनगरसेवक प्रवीण शाह व बिनाबेन दोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

            जैन समाजाचे अर्थव्यवस्थाउद्योगशिक्षणवैद्यकीय सेवा व सेवा क्षेत्रांत फार मोठे योगदान आहे. भगवान महावीरांनी दिलेल्या करुणेच्या शिकवणीचे पालन करीत जैन संघटनांनी अन्नधान्य वाटपपांजरापोळ येथे मदतमास्क वाटपआदी समाजोपयोगी कार्य करून कोरोनाला पराभूत करण्यासाठी मदत केलीअसे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.

            जैन साधू संतांनी धर्म जागृतीचे कार्य केले त्याप्रमाणे जैन संघटनांनी करोना विषयक सुरक्षित आचरणाबाबत जनजागृती करून कोरोनाची तिसरी लाट येणार नाही या दृष्टीने कार्य करावेअसे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

            यावेळी 27 जैन संघटनांच्या प्रतिनिधींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चेतन शाहदिलीपभाई शाहबकुलभाई शाहहितेंन्द्र शाहनवरत्न संघवीदिनेश शाहहितेश शाहहिरेन शेठरमेशभाई जैनचंद्रकांत दोषीरमेशकुमार शाहहितेंन्द्र मोखीयाअशोक शाहकिरीटभाई मणीयारमनिष तातेड,  धिरजलाल शाहजिग्नेश शाहजितेंन्द्र शाहराजुभाई वोरासुशांत शाहकिरीट शाहसुरेश लखाणीरमेशभाई सांघवी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

००००

 

Governor Koshyari felicitates 27 Jain Sanghas for their work during COVID pandemic

 

            Mumbai Dated 30 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari felicitated representatives of 27 Jain Sanghas from Borivali Mumbai for their outstanding work during the COVID-19 pandemic. The felicitation of the Corona Warriors was held at Raj Bhavan, Mumbai on Friday (30th July).

            Borivali MLA Sunil Rane, Convenor of the Borivali Jain Sanghas Snehal Shah, Corporator Pravin Shah and Binaben Doshi were prominent among those present.

            Chetan R Shah, Dilipbhai V. Shah, Deepakbhai S. Shah, Bakulbhai A. Shah,  Hitendra S. Shah, Navratan J. Sanghvi, Dinesh T. Shah, Hitesh B. Shah, Hiren B. Sheth, Rameshbhai Jain, Chandrakant Doshi, Rameshkumar A. Shah, Hitendra Mokhiya, Ashok M. Shah, Kiritbhai M. Maniyar, Manish Tater, Dhirajlal l. Shah, Jignesh Shah, Jitendra D. Shah, Rajubhai Vora, Kantibnhai C. Shah, Kirit K. Shah, Suresh H. Lakhani, Rameshbhai Sanghvi were felicitated by the Governor.

0000



 कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करुन

स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या सूचना

 

            मुंबईदि. ३० : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापन दिन रविवार दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता ब्रेक दी चेनअंतर्गत शासनाने ४ जून २०२१ अन्वये आदेश पारित केले आहेत. गत वर्षीप्रमाणेच यावर्षीही राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. हा कार्यक्रम साजरा करताना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावीअसे निदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात आले आहेत.

            राज्यात सर्व विभागीयजिल्हाउपविभागीयतालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा. पुणेनागपूरऔरंगाबादनाशिकअमरावती व कोकण विभागीय आयुक्त यांनी आपापल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संबंधित पालकमंत्री ध्वजारोहण करतील. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात यावा. या दिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावा. राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत वाजविण्यात यावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅण्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजवावा. यावेळी करण्यात येणाऱ्या भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्व विषद करणारे तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता याकरीता कार्य करण्यासाठी प्रेरित करणारे असावेअसे निर्देश देण्यात आले आहेत.

            ध्वजारोहण करणारे मंत्रीराज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर पोहचू शकणार नसल्यास विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करुन ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. संबंधित प्रांत अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गाव प्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील. स्थानिक लोकप्रतिनिधीस्वातंत्र्यसैनिकशहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच कोरोनायोध्दे जसे डॉक्टर्ससफाई कामगारआरोग्यसेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही नागरिकांना निमंत्रीत करावे. कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर (Social Distancing) संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईलयाची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असेलआयोजकांनी त्यानुसार मान्यवरांना निमंत्रित करण्याची कार्यवाही करावी. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. सुरक्षित वावराच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करावे व अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावायासाठी वेबसाइटद्वारे थेट प्रक्षेपण करावेअशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

            या कार्यक्रमातून व सोशल मीडियाद्वारे आत्मनिर्भर भारत’ या घोषणेचा प्रसार करावा. दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे: वृक्षारोपणआंतर शालेयआंतर महाविद्यालय स्तरावर ऑनलाईन पध्दतीद्वारे वादविवाद स्पर्धाप्रश्नमंजूषादेशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. महत्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा. सोशल मिडीयाद्वारे निवडक विद्यार्थीविद्यार्थीनींचे देशभक्तीपर गाणेभाषणे आयोजित करावीत. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावीएखाद्या विषयाचा वेबिनार आयोजित करावाएनएसएस व एनवायकेएसद्वारे देशभक्तीपर ऑनलाईन मोहिम राबविण्यात यावीतसेच सोशल मिडीया व डिजीटल माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मतेसंबंधातील गाण्यांचा प्रचार करावासंदेश द्यावानागरिकांनी घराच्या बाल्कनीगच्चीवरुन राष्ट्रीय ध्वज हलविणेयाप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देखील स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावीअसे आवाहन करण्यात आले आहे.

            राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर तसेच ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर (उदा. रायगडसिंहगडशिवनेरीपुरंदरवसईप्रतापगडदौलताबादसिताबर्डी) राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.  राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक दिनांक २० मार्च १९९१५ डिसेंबर १९९१ आणि ११ मार्च १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सुर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी. पुणेनागपूरऔरंगाबादनाशिक व अमरावती विभागीय आयुक्त हे त्यांच्या मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाची व्यवस्था करणार असल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. कोकण विभागीय आयुक्त हे कोकण भवन येथील समारंभाची व्यवस्था करतील. मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहणाची कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.

            याप्रमाणे सर्वसाधारण निर्देश देण्यात आले असले तरी कोविड १९ सकारात्मक दर (Positivity Rate) विचारात घेऊन संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आपआपल्या अधिकारक्षेत्रात स्वातंत्र्य दिनाचे महत्व लक्षात घेऊन साजेसा समारंभ साजरा करण्यासंबंधी पालकमंत्री यांच्या सहमतीने आवश्यक ती उचित कार्यवाही करण्यासाठी मुभा देण्यात येत आहे.

            यासंदर्भातील शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत निर्गमित करण्यात आले असून ते राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

००००


 अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान;

सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज

मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

 

            मुंबईदि. 30 : राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविला आहे.

            सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ही माहिती दिली. ते म्हणाले कीराज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टीपूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वाधिक सुमारे 700 कोटी रूपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागात झाले असूनत्याखालोखाल पुणे विभागअमरावती विभागऔरंगाबाद विभागनागपूर विभाग व नाशिक विभागाचा क्रम आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील हानीची पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय मुख्य अभियंत्यांची व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अद्यापही अनेक ठिकाणी पाऊस सुरू असूनदरडी साफ करण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहेतर अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त रस्त्यांची छायाचित्रे व ड्रोन चित्रिकरणाच्या माध्यमातून प्राथमिक हानीचा अंदाज काढण्यात आला आहे.

            प्राथमिक अंदाजानुसार 290 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते469 रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती तर 140 पूल व मोऱ्या पाण्याखाली गेले होते. अंतिम पाहणी अहवालात नुकसानाच्या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या मंगळवारी 3 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाची मुंबईत बैठक होणार असून त्यावेळीही राज्यातील परिस्थितीचा पुनःश्च आढावा घेतला जाईल. दरम्यानराज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या नुकसानाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.

 कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटल ते शिवाजी पुल रस्ता पूरबाधित भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

पूरग्रस्त नागरिकांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

 

       कोल्हापूरदि. 30 : पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील असा दिलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटल ते शिवाजी पुल रस्ता पूर बाधित भागाची पाहणी करताना नागरिकांना दिला.

            यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफपालकमंत्री सतेज पाटीलआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागरमुख्य सचिव सीताराम कुंटेजिल्हाधिकारी राहुल रेखावारमहापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडेपोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

            यावेळी पंचगंगा हॉस्पिटल परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात धान्य वाटप करण्यात आले.

0000

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या व्यथा

 

            कोल्हापूर, दि. 30 :- नागरिकांनो ! घाबरू नकाकाळजी करू नका. सध्या आपण कोरोनाशी लढतो आहे . संयम बाळगा . येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू. अशा आश्वस्त शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाहुपूरी 6 व्या गल्लीतील पूरबाधित राहिवाशांशी अत्यंत आत्मियतेने संवाद साधला. पुरामुळे बाधित झालेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी ते आज कोल्हापूरात आले होते.

      यावेळी स्थानिक रहिवासी पूजा नाईकनवरे यांनीआपत्कालीनस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी खूप आधार दिला असल्याचे सांगितले .तर पूरबाधित गणेश पाटील म्हणालेयंदा २००५ व २०१९ पेक्षाही मोठा असून शासनाने भरीव मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

            यावेळी पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफखासदार  संजय मंडलिकखासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकरआमदार ऋतूराज पाटीलमुख्य सचिव सिताराम कुंटेजिल्हाधिकारी राहूल रेखावार ,मनपा आयुक्त डॉ . कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते.

0000

 कोरोना काळातील सेवाकार्यामुळे समाजातील नकारात्मक चित्र बदलले

राज्यपाल कोश्यारी

 

            मुंबई, दि. 30 : समाजातील अधिकांश लोक चांगले काम करण्यास उत्सुक असतात. कोरोना संसर्गाच्या सव्वा वर्षाच्या काळात शासकीय अधिकारीकर्मचारीअशासकीय संस्था व एकूणच समाजातील सर्व लोकांनी कर्तव्यापलीकडे जाऊन सेवाकार्य केल्यामुळे समाजातील नकारात्मक चित्र बदलले. कोरोना हे जसे आव्हान होते तसेच ती एक सेवेची संधी ठरली, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत कोविड टास्क फोर्सच्या माध्यामातून कोरोना काळात कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते ठाणे सिटिझन्स प्राईड’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

            कार्यक्रमाला पोलीस महासंचालक व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसळकरठाणे सिटिझनस फोरमचे अध्यक्ष कॅस्बेर ऑगस्टीन व जेव्हीएम धर्मादाय फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मेहता उपस्थित होते.

            कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून सर्व कोरोना योद्ध्यांनी यानंतर जनतेमध्ये जाऊन मास्क वापरसुरक्षित अंतर राखणे आदी कोरोना विषयक सावध आचरणाबाबत जनजागृती करावी असे आवाहन राज्यपालांनी केले. 

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी पोलीस महासंचालक विवेक फणसळकरठाण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदही रानडेनिवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटीलउपजिल्हाधिकारी रेवती गायकरएस डी ओ अविनाश शिंदेजिल्हा वैद्यकिय अधिकारी डॉ कैलाश पवार, तहसिलदार अधिक पाटीलमनोरुग्णालयचे अधिक्षक डॉ संजय बोदडेसर्कल अधिकारी संजय पतंगेतलाठी आरती नितीन यशवंतरावपरिचारिका वर्षा दळवीसारिका ढोकलेठाणे पोलीस दलातील जहांगीर चोहारीवॉर्डबॉय विक्की धाकोलियाठाणे महानगरपालिकेच्या कोविड टास्क फोर्स टीमचे वैद्यकिय अधिकारी डॉ वैजयंती देवगेकरछत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ भीमराव जाधवउपजिल्हाधिकारी वर्षा दिक्षीतठाणे महानगरपालिकेचे गिरीश झलकेडॉ प्रेषिता क्षिरसागरडॉ अनिता कापडणेवैद्यकिय अधिकारी डॉ मिलींद उबाळेडॉ योगिता धायगुडेडॉ खुशबू टावरीडॉ अदिती कदम,  डॉ ए ए माळगावकरडॉ प्रज्ञा जाधवडॉ जयेश पानोतडॉ स्मिताली हमरूस्करडॉ अयाझ शेखअधर कुलकर्णी,  डॉ समिधा गोरेदिलीप सुरेश महालेठाणे अग्निशामक दलाचे निलेश वेताळसिस्टर मंगल पवारफादर बापटीस्ट विगासबेथानी रुग्णालयाचे मुख्याधिकारी स्टीफनडॉ संतोष कदमडॉ अंकित ठक्करडॉ संदीप कदमडॉ रहीश रवीन्द्रनडॉ मुकेश उदानीआदींना ठाणे सिटीझन्स प्राईज ॲवार्ड २०२१ ने सन्मानित करण्यात आले.

**


 

Ex Thane CP Vivek Phansalkar, Addl. Collector Vaidehi Ranade receive Thane Citizen’s Pride Awards

 

            Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Thane Citizen’s Pride Awards to COVID Task Force officials working under the Thane Collector and Thane Municipal Corporation at Raj Bhavan, Mumbai on Friday (30th July).

            Director General of Police and former Commissioner of Thane Vivek Phansalkar, Additional Collector Vaidehi Ranade, RDC Dr Shivaji Patil, Dist Civil Surgeon of Thane Dr Kailash Pawar, Dy Collector Revati Gaikar were among those honoured with the Thane Citizen’s Pride Award.

            Kasber Augustine, President of Thane Citizen’s Foundation and Jitendra Mehta of JVM Charitable Foundation were present.

००००

Featured post

Lakshvedhi