Wednesday, 28 July 2021

 वीज नसलेली पूरग्रस्त गावं सौर दिव्यांनी उजळणार

ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांची घोषणा

·ऊर्जामंत्र्यांनी केली रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी

  

मुंबईदि. 27 : पुरामुळे ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नाहीत्या गावातील घरांना मोफत सौर दिव्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. यामुळे पूरग्रस्त भागातील नागरीकांना मोठा दिलासा दिला मिळणार आहे.

अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या रायगड जिल्ह्यासह कोकणातील वीज पुरवठा यंत्रणा तात्काळ पूर्ववत करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले आहेत. रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी पेणमहाड, नागोठणे येथील पूरग्रस्त भागांची आणि महावितरण व महापारेषण यंत्रणेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरेजिल्हाधिकारी निधी चौधरीमहावितरणचेसंचालक (संचलन) संजय ताकसांडेमराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे उपस्थित होते.

महाड तालुक्यातील वीज यंत्रणेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. महाड येथे सावित्री नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे पडलेल्या उच्चदाब वाहिनीच्या टॉवरच्या ठिकाणी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. महापारेषण व महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज यंत्रणा उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पूरपरिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरू असलेली कर्मचाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद असल्याची पावती त्यांनी दिली.

डॉ. नितीन राऊत यांनी महाड येथील दौऱ्यादरम्यान दिवंगत काँग्रेस नेते माणिकराव जगताप यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. यानंतर ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी राजावाडी तसेच विरेशवर गावातील बाधित झालेल्या विद्युत यंत्रणेची पाहणी केली. तसेच महापारेषण अतिउच्चदाब केंद्राची पाहणी केली.

22 जुलै रोजी सावित्री नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यामुळेउच्चदाब वाहिनीचे दोन टॉवर पडल्याने महाड तालुक्यातील गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. तथापि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे २६ जुलै रोजी महावितरणच्या गोरेगाव स्विचिंग उपकेंद्रातून बॅक फिडर मार्फत २२ के.व्ही. लोणेरे फिडर द्वारे २२ के.व्ही वाहूर फिडर चालू करून ८० गावांचा वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने सुरू करण्यात आला असल्याचे डॉ राऊत यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांचे कौतुक

महावितरण,महापारेषणच्या कर्तव्यदक्ष आणि धाडसी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावून अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुरू केला. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर विद्युत विभाग करत आहे. नदी पात्रात मगरींचे वास्तव्य असताना देखील आमचे कर्मचारी पाण्यात पोहत वीज खांबावर चढून वीज यंत्रणा पुन्हा उभारणीचे काम करत आहेत. त्यांना मी सलाम करतोत्यांच्या या कामगिरीमुळे आमची छाती अभिमानाने फुलून आली असे गौरवोद्गार डॉ राऊत यांनी वीज कर्मचाऱ्यांप्रति काढले.

पूरग्रस्त भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अनेक भाग प्रकाशमान केले आहेत. बाधित झालेल्या १३०८ वितरण रोहित्रांपैकी २६१४७१ पाणीपुरवठा योजनांपैकी २९ तर ८ कोविड हॉस्पिटल/ व्हॅकसीनेशन सेंटरपैकी ३८३ मोबाईल टॉवरपैकी १९ असे एकूण ३५,५६० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले.

गरजूंना वस्तूंचे वाटप

मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनामहाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन,सबोर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन आदींच्यावतीने महाड येथील बौद्ध वाडी व अदिवासी वाडी येथे पूरग्रस्त गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वितरण डॉ. राऊत यांच्या हस्तेकरण्यात आले.

000



साताऱ्यातील भूस्खलनग्रस्त मीरगावआंबेघरहुम्बराळे गावाचे तात्पुरते पुनर्वसन

जलसंपदा विभागाच्या क्वार्टर्समध्ये करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

·       भूस्खलनामुळे जीवितहानी झालेल्या मीरगावहुम्बराळे गावांना दिली भेट

·       भूस्खलनग्रस्त गावातील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूचे केले वाटप

 

            मुंबईदि. 27 : कोयना धरणाच्या पट्ट्यातील भूस्खलनग्रस्त मीरगावआंबेघरहुम्बराळे गावातील ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन सध्या जलसंपदा विभागाच्या क्वार्टर्समध्ये करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक प्रशासनाला दिले. आज त्यांनी स्वतः जाऊन या जलसंपदा विभागाच्या निवासी वसाहतींची पाहणी केली. त्यानंतर त्यानी या वसाहतींची डागडुजीचे काम वेगाने पूर्ण करून त्यात या 150 कुटुंबांचे स्थलांतर करण्याचे निर्देश दिले.

            गेल्या काही दिवसात राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील कोयनानगर परिसराला देखील बसलेला होता.  यात या परिसरातील मीरगावआंबेघरहुम्बराळे गावात भूस्खलनात 30 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. नगरविकास मंत्र्यांनी तातडीने इथे येऊन मीरगाव आणि हुम्बराळे या गावांना भेटी देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. या गावकऱ्यांचे एमटीडीसीच्या पर्यटन रिसॉर्ट आणि कोयनानगर जिल्हापरिषद शाळेत तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. श्री. शिंदे यांनी या ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. या कठीण प्रसंगात शासन पूर्णपणे तुमच्यासोबत असून तुमच्या पुनर्वसनाबाबत लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढू अशी ग्वाही त्यानी यावेळी दिली. त्यासोबतच या ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूचादरीकपडेसतरंज्याचटयाछत्र्या अशी मदत दिली. यासोबतच शासनाची मदत देखील तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवली जाईल असेही सांगितले. 

            यानंतर या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या वसाहतीत करण्याचा पर्याय पुढे आला. कोयनानगर परिसरातील या वसाहती कोयना धरण बांधताना उभारण्यात आल्या होत्या. या वसाहतींची डागडुजी केल्यास तो पुनर्वसनासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल यावर एकमत झाल्याने त्यांनी तातडीने हे डागडुजीचे काम हाती घेण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच या भूस्खलनग्रस्त गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी बृहद आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याने ते देखील लवकरच करू असे ग्रामस्थांशी बोलताना स्पष्ट केले.

            यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, ठाण्याहून पुरग्रस्तांसाठी मदत घेऊन आलेले नगरसेवक राम रेपाळेनगरसेवक योगेश जानकरशशिकांत जाधव आणि स्थानिक अधिकारी  उपस्थित होते.

००००


 

सध्याच्या नैसर्गिक आपत्तीतही केंद्राने तातडीने मदत करावी

- कृषिमंत्री दादाजी भुसे

·       गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीतील पिक नुकसानीसाठी 701 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल

कृषीमंत्र्यांनी मानले केंद्र शासनाचे आभार

 

            मुंबई, दि. 27 :   गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोकण तसेच इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राज्य सरकारतर्फे केंद्राला आर्थ‍िक मदतीची विनंती करणार असून केंद्र सरकार याची योग्य ती दखल घेवून तातडीने मदत करेल अशी अपेक्षा कृषी मंत्री भुसे यांनी व्यक्त केली आहे.

            राज्यात गेल्या वर्षी म्हणजे जून ते ऑक्टोबर 2020 दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात एनडीआरएफमधून अर्थसहाय्य करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे एका निवेदनाद्वारे केली होती. लोकसभेमध्ये केंद्रीय कृषीमंत्र्यांनी या अनुषंगाने पिकांच्या नुकसानीसाठी 701 कोटी रुपयांची मदत जाहीर केलीत्याबद्दल राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी धन्यवाद दिले आहेत.

            गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीनंतर नुकसान भरपाईपोटी 3721 कोटींची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने निर्णय घेवून 4375 कोटी शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी वाटप केले. राज्याने केलेल्या 3721 कोटी रुपयांच्या मागणीपैकी 701 कोटी रुपये मदत देण्याचे केंद्र शासनाने घोषित केले आहे,अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

0000

 वन्यप्राण्यांना दत्तक घ्या;

वन्यजीव संवर्धनास मदत करा

_______

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची योजना

 

            मुंबई, दि. 27 : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथील वन्य प्राणी आता दत्तक घेता येतील. सिंहवाघबिबटवाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल इथे केली जाते. उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वने व वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. वन्यजीव प्रेमीसंस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना १ वर्षाकरीता दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी व्हावे, असे आवाहन वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जी. मल्लिकार्जुन यांनी केले आहे. ही दत्तक रक्कम एका वर्षांसाठी आहे

 

वाघ रुपये ३,१०,०००,

सिंह रुपये ३,००,०००,

बिबट रुपये १,२०,०००,

वाघाटी रुपये ५०,०००

नीलगाय रुपये ३०,०००,

चितळ रुपये २०,०००,

भेकर रुपये १०,०००,

 

            अधिक माहिती आणि अर्ज करण्याकरिता इच्छुकांनी खालील कार्यालयाशी संपर्क साधावा.

वन संरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई २. अधीक्षकसिंह विहारसंजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई

 

ईमेल

lionsafaripark@gmail.com

भ्रमणध्वनी क्र. ७०२०२८२७१४

 होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत

राज्यशासन सकारात्मक

- आरोग्यमंत्री राजेश टोपे

 

            मुंबईदि. 27 : राज्यातील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्यशासन सकारात्मक आहेअशी ग्वाही देताना राज्यात शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्यासंदर्भात  प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

            मंत्रालयात होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या  मागण्यांबाबत बैठक झाली. यावेळी आमदार विक्रम काळेआरोग्य विभागाचे आयुक्त डॉ.रामास्वामीमहाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ.उत्तुरेआयुष संचालक डॉ.कोहलीकेंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ अरुण भस्मेविद्यापीठाच्या विद्या परीक्षेचे सदास्य डॉ.  बाळासाहेब पवार,  आदी उपस्थित होते.

            शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करावाअसे आरोग्यमंत्र्यांनी सां‍गितले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या (क्र.108) रुग्णवाहिकांमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना नियुक्ती मिळावी यासाठी त्यासंदर्भात असलेले न्यायालयाचे निर्णय याबाबत विधी व न्याय विभागाचे मत नोंदण्यात येईलअसे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेण्यात येणार असून त्यावेळी त्यांच्याशी होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली जाईलअसेही त्यांनी सांगितले. 

            सीसीएमपी कोर्स केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये नोंदणी मिळण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ. सोमनाथ गोसावी,राष्ट्रीय होमिओपॅथी कमिशनच्या सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ. प्रमोदींनी पागे,डॉ. बाळकृष्ण गायकवाडपरिषदेचे रजिस्ट्रार वैद्य सोनमांकार आदी उपस्थित होते.

 शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढणारा कार्यकर्ता हरपला!

डॉ. शांतिलाल कोठारी यांच्या निधनावर देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना

 

मुंबई, 27 जुलै

डॉ. शांतिलाल कोठारी यांच्या निधनाने शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढणारा एक खंदा कार्यकर्ता हरपला असल्याची शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

 

लाखोळीची डाळ असो की सोयाबीनची उत्पादनंत्यांचे संपूर्ण आयुष्यच संशोधन आणि संघर्षाचे राहिले. कोणत्याही विषयाचा गाढा अभ्यास करून त्यासाठी संपूर्ण समर्पण भावनेने ते लढा देत असत. संघर्ष करताना त्यांची जिद्द आणि चिकाटी वाखणण्यासारखी होती. एकदा एखादा विषय त्यांनी हाती घेतला की मग त्यातून ते माघार घेणार नाहीतहे सर्वांना ठावूक असायचे. नागपूरकरांसाठी ते सोयामिल्कचे संशोधक म्हणून सुद्धा सुप्रसिद्ध होते. विविध फ्लेवरयुक्त सोयामिल्क पिण्याची सवय त्यांनी नागरिकांना लावली. हे दूध आरोग्यदायी आहेअसे ते तास न् तास समजावून सांगत असत. मोहफुलांच्या पावडरचा चहा त्यांनी शोधून काढला. शेतकर्‍यांच्या विविध उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळावी आणि त्यातून अधिकचा पैसा शेतकर्‍यांना मिळावाहाच त्यांचा सदोदित प्रयत्न असायचा. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोतअसे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.

*********

 


 *सकाळी लवकर उठ!” “बाकी सगळं आपोआप होईल”* 


या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते,


काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणून त्याने सकाळी चार वाजता उठायला सुरुवात केली,


 *आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलून गेलं!* 


 *पहाट आणि सूर्योदय इतके जादुई असतात का?* 


 *इतक्या सकाळी उठून काय करावं?* 


ह्या प्रश्नावर हेल ने एक कोडवर्ड सांगितलाय.


*‘SAVERS’*


ह्या आयुष्य बदलून टाकणार्‍या सहा सवयी आहेत.


१) *Silence – (ध्यान)*


- शांत बसून स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान!


- स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान!


- मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करून व्हायरस रिमूव्ह करणे म्हणजे ध्यान!


- मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!


- माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान!


- अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवून घेण्याची कृती म्हणजे ध्यान!


----------------------------------


२) *Affirmations – (सकरात्मक स्वयंसूचना)*


- अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद!


- स्वतः स्वतःला सूचना देणं,


- प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!


- येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवसभर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसूचना!


- स्वयंसूचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाट्यमयरित्या सत्यातही उतरतात.


- अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो.


- आपले पूर्वज म्हणायचे, शुभ बोल नाऱ्या!..किंवा जिभेवर सरस्वती असते, आपण बोलू तसेच घडते, जिभेवरच्या देवता तथास्तु म्हणतात, वगैरे वगैरे


- या सगळ्या अंधश्रद्धा नव्हत्या, ह्यामागे मनोविज्ञान आहे.


- एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली, तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे?


- वाईट बोलून विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!...


-----------------------------------


३) *Visualize – (चांगल्या कल्पना घोळवणे.)*


तीव्र इच्छा पूर्ण झाली आहे, अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटलावर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिजुअलायझेशन!


- कल्पनाशक्ती ही भगवंताने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे.


- कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं.


- दररोज आपण आपली ध्येयं पूर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे.


- पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो.


- ऑलंपीक विजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे.


- मायकेल स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो.


- प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, “यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!”


-----------------------------------


४) *Exercise – (व्यायाम)*


- शरीरातून आळसाला पळवून लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम!


- शरीर आळसावलं की, मन भ्रष्ट झालंच समजा!


- व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त मैथुनाकडे वळते, आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.


- वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.


- तो कशावरच एकाग्र होऊ शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होऊ शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.


- ह्या सगळ्या दुष्ट श्रृंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,


- शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.


----------------------------------


५) *Reading – (वाचन)*


- पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.


- पुढच्याच ठेच, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.


- वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क झुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.


------------------------------------


६) *Scribing – (लिहिणे.)*


- माझे ठाम मत आहे, की माझ्या आयुष्यातल्या खडतर काळात मी जर लिहीत राहीलो नसतो तर मी आज जिवंत राहीलो नसतो.


- लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.


- लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.


- लिहिल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.


- म्हणून संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.


- लिहिणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे.


- लिहिल्याने विचार पक्के होतात.


- सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं.


- एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत.


- मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.


- ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,


- आणि रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत, आणि पूर्ण झाली की, स्वतःला विजयी घोषित करावं.


- लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!


- जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.


- अशाने अंतरंग फुलून येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.


ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे.


वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या आहेत?

 *ह्या सगळ्या सवयींचा खूप खूप फायदा झाला .* 


 *तुम्हालाही ह्या सवयी उपयुक्त ठरतील. वापरून पहा.*

 Salutes to chandrashekhar Azad 


'ए म्हातारे, तू इथे येत नको जाऊस.! तुझा मुलगा डाकू होता, दरोडेखोर होता, म्हणून इंग्रजांनी त्याला गोळी घातली.!'

गावाशेजारच्या जंगलात लाकडं गोळा करताना गांधीबाबाच्या  एका अहिंसात्मक जमावाने त्या वृद्धेला अडवून धमकावलं.! 


"नाही, हो.! माझ्या चंदू ने ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाव म्हणून हौतात्म्य पत्करल.!" त्या वयोवृद्ध स्त्री ने मोठ्या अभिमानाने सांगितलं.! 


त्या वयोवृद्ध स्त्री चे नाव होते, जगरानीदेवी.! 

आणि त्यांना पाच मुलं होती.! त्यातले चार आधीच गेले होते आणि सगळ्यात धाकटा मुलगा थोड्या दिवसांपूर्वीच हुतात्मा झाला होता.! आणि ही आई त्याला प्रेमाने चंदू म्हणायची आणि बाकी सगळं जग त्याला आझाद हो, चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखायचं.! 


भारत स्वतंत्र झाला होता.! आझाद चे मित्र, सदाशिवराव एक दिवस आझाद च्या आईवडिलांचा शोध घेत त्यांच्या गावात आले.! 

स्वातंत्र्य तर मिळालं होतं, पण खूप काही संपून गेलं होतं.! चंद्रशेखर आझाद ह्यांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता


निर्धनावस्थेत पतीच्या मृत्यू नंतर ही निर्धन, निराश्रित, वृद्ध आई त्या वृद्धावस्थेत कोणासमोर हात पसरण्यापेक्षा जंगलात जाऊन लाकडं, 

शेण्या गोळा करून आणि त्या विकून स्वतःची गुजराण करत होती.! 


शरमेची गोष्ट अशी होती की देश स्वतंत्र झाल्यावर सुद्धा त्यांची ही अशी अवस्था दोन वर्षे सुरू होती.! १९४९ पर्यन्त.!


चंद्रशेखर आझाद ह्यांना दिलेल्या एक वचनाची आठवण देऊन सदाशिवराव हे जगरानी देवींना आपल्यासोबत झाशीला घेऊन आले.! पण त्यांची स्वतः ची आर्थिक परिस्थिती ही अतिशय खराब असल्याकारणाने त्यांनी आझादांचे अजून एक मित्र भगवान दास माहोर ह्यांच्या घरी त्या आईंच्या राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची मनापासून सेवा केली.!


आनंद कुलकर्णी


मार्च १९५१ मध्ये जेंव्हा श्रीमती जगरानीदेवी ह्यांचा स्वर्गवास झाला तेंव्हा सदाशिवराव ह्यांनी स्वतःच्या आईप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार केले.!


त्यांच्या निधनानंतर झाशी च्या जनतेने त्यांच्या स्मृतीमध्ये सार्वजनिक जागेवर त्यांच्या नावाने एका स्मृतिकेंद्राची स्थापना केली.! 


त्यावेळच्या राज्यसरकारने (त्यावेळी सरकार काँग्रेस चे होते, आणि मुख्यमंत्री होते गोविंद वल्लभ पंत.!).! त्यांनी ह्या स्मृतिकेंद्राला त्यावेळच्या पंतप्रधानांच्या म्हणजे नेहरूंच्या सांगण्यावरून बेकायदा घोषित केलं.! 


तरीपण ह्या शासनाच्या आदेशाला न जुमानता झाशीच्या नागरिकांनी चंद्रशेखर आझाद ह्यांच्या मातोश्रींचा पुतळा त्या जागेवर बसवण्याचा निर्णय घेतला.! 


तो पुतळा आझादांचे निकटवर्तीय सहकारी श्री रुद्र नारायण सिंह ह्यांनी तयार केली होता.!


जेंव्हा सरकारला हे समजलं की ही क्रांतिकारी मंडळी काहीही झालं तरी ह्या पुतळ्याची स्थापना झाशीच्या जनतेच्या मदतीने करणार आहेत, तेंव्हा सरकारने हा समारंभ देश, समाज, आणि न्यायव्यवस्था ह्यासाठी धोका उत्पन्न करेल म्हणून ह्या कार्यक्रमाला प्रतिबंध करून सगळ्या झाशीत कर्फ्यू जाहीर केला.! 


जनतेला आणि ह्या मंडळींना आझादांच्या मातोश्रींचा पुतळा स्थापन करता येऊ नये म्हणून सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त होता.!.


पण ह्या सरकारी आदेशाला, कर्फ्यूला आणि पोलीस बंदोबस्ताला धाब्यावर बसवून सदाशिवराव, भगवानदास माहोर आणि इतर सर्व जनता पुतळा घेऊन स्थापन करण्यासाठी उत्साहाने निघाली.! 


आपल्या आदेशाच्या चिंधड्या उडवून जनता निघालेली बघून सरकार खवळले आणि सरकारने  पोलिसांना पुतळा हातात घेतलेल्या श्री सदाशिवराव ह्यांना गोळी घालायचा आदेश दिला.! 


पण मूर्ती हातात घेतलेल्या सदाशिवराव ह्यांना जनतेनी सर्व बाजूने वेढून घेतलं, आणि पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोचू नाही दिलं.! 

मग खवळलेल्या पोलिसांनी अंदाधुंद लाठीचार्ज केला.! शेकडो लोक जखमी झाले.! बरेच जन्मभराचे अपंग झाले त्या लाठीमारात.! तीन जणांचा मृत्यू झाला.! 


देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे प्राण ओवाळून टाकणाऱ्या हुतात्मा चंद्रशेखर आझाद ह्यांच्या मातोश्रींचा पुतळा स्थापित नाही होऊ शकला.!


कोणत्या तोंडाने आपण आझादांना श्रद्धांजली द्यायची ? कोणत्या तोंडाने आपण त्यांना एक हुतात्मा म्हणून आठवायचं ?


आझादजी, आम्ही तुमच्या मातोश्रींच्या तीन फुटाच्या पुतळ्याला ह्या देशात पाच फूट जागा पण नाही देऊ शकलो.!


ज्या देशासाठी तुम्ही तुमच्या प्राणाचे बलिदान केले, त्याच देशाच्या काँग्रेसी पंतप्रधानाने तुम्ही ज्या बागेत शेवटी लपला होता त्या बागेचा पत्ता ब्रिटिश सरकारला सांगितलाच, पण तुम्ही हुतात्मा झाल्यावर सुद्धा त्या काँग्रेसी सरकारने तुमच्या मातोश्रींच्या पुतळ्याला सुद्धा जागा नाही मिळू दिली.! 


आणि फक्त तुमचाच नाही तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अश्या अनेक वीरांचा ह्या काँग्रेसी सरकारने अपमान केलाय.! त्यांना देशाच्या जनतेच्या स्मृती मधून ओरबाडून फेकून दिलंय.!.


तरीपण आज वीर हुतात्मा चंद्रशेखर आझाद ह्यांना मी झुकल्या मानेने नतमस्तक होऊन नमन करतो, त्यांच्या जयंतीनिमित्य.! 

🙏🙏🙏🙏🙏


वंदे मातरम.! 


©️ आनंद कुलकर्णी


संदर्भ : Indian Revolutionaries : A comprehensive Study 1757 - 1961

Tuesday, 27 July 2021

 ✍  *प्रारब्धवशात जे आहे तेच होते....१) लग्न  (२) पैसा  (३)  मरण  (४)  अन्न  (५)  जन्म... हे ज्याचे जिथे असतील तिथे ओढून घेऊन जातात...१)  रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रम्हदेवांना विचारले, "या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ?" ब्रम्हदेवांनी कुंडली पाहून सांगितले, "समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे, त्याच्याबरोबर होणार आहे." रावणास राग आला. माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची ? शक्यच नाही. नोकरांना सांगितले, "याला समुद्रात फेकून द्या." नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकला. तो मुलगा एका बेटावर पोहोचला. तिथला राजा वारला होता. लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते. हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली. लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले. मुलगा वयात आला. *रावणाची कन्या उपवर झाली.* बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला. रावणाने पाहुणचाराकरिता जावयास बोलाविले. *रावण म्हणाला, "ब्रम्हदेवपण हल्ली खोटे बोलतो." त्याने सांगितले होते, "माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार म्हणून. पण आपण तर राजकुमार आहात." जावई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे." पायाचा अंगठा दाखविला. मग रावणास खात्री पटली. या ब्रम्हदेवाच्या गाठी असतात...२)  पैसा -* ज्याला ज्या ठिकाणी मिळायचा त्या ठिकाणीच मिळतो.... *३) -* ज्याचे मरण जिथे असते तिथेच येते.... *कथा -* एकदा गरुडाची आई आजारी पडली. सर्व येऊन भेटत होते. गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी, आज कोण कोण आले होते ? आई सर्वांची नावे सांगत होती. एकदा यमराज आले व भेटून गेले. पण जाताना हसले. संध्याकाळी गरुडाने आईस विचारले, आज कोण आले होते ?  आई म्हणाली,  *आज यमराज आले होते व जाताना हसले."* गरुडास शंका आली, का हसले असावे ? त्याने आईस उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले. *यमराज दुसऱ्या दिवस तिथेही आले. यमराजांना गरुडाने विचारले, "आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण जाताना आपण हसला का ?" यमराज म्हणाले,  "आपल्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून हसलो."  त्यावेळी गरुडाची आई झाडाच्या खोडात वारली होती... तात्पर्य -* काहींचा मृत्यू एस् टी त, काहींचा रेल्वेत, काहींचा विमानात, काहींचा पाण्यात, काहींचा रस्त्यावर हे सर्व काळाच्या हातात आहे... पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे..     🙏🌹  *संकलन - ह.भ.प. बळीराम (दादा) आळंदीकर*  🚩🚩🚩🇹🇯

Featured post

Lakshvedhi