Saturday, 1 August 2026

जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ साठी अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ साठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. ३१ : राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग / संस्था जिल्ह्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याचे युवा धोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार शासन निर्णय दि. १२ जानेवारी २०१३ नुसार देण्यात येतात.

 

२०२५-२६ या वर्षात जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार प्रत्येक जिल्ह्यातील १ युवक, १ युवती व १ नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरुप युवक-युवती यांना रोख रु.१०,०००/- संस्थेस रु. ५०,०००/- तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे.

 

जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणा-या संस्था यांची गत तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन विचारात घेण्यात येणार असून राज्य युवा पुरस्कार २०२५-२६ साठी अर्ज १५ सप्टेंबर २०२६ रोजी पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक असणार आहे.

 

या अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. राज्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणा-वा संस्था यांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन मा. जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi