राज्यात उद्योग, पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा, लॉजिस्टिक्स, पर्यटन, कृषी, अन्न प्रक्रिया आणि स्टार्टअप्स या क्षेत्रांत वेगाने प्रगती होत असल्याचे सांगून महाराष्ट्राला केवळ आर्थिक गुंतवणूक नव्हे, तर जागतिक मराठी समाजाचे ज्ञान, अनुभव, कौशल्य आणि जागतिक संपर्क जाळेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेला 'महाएनआरआय कनेक्ट' हा उपक्रम जगभरातील मराठी समाजाला महाराष्ट्र शासनाशी जोडणारे प्रभावी डिजिटल व्यासपीठ ठरणार असून गुंतवणूक, उद्योग, ज्ञानाची देवाणघेवाण, सांस्कृतिक आदानप्रदान आणि शासनाशी थेट संवादासाठी त्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment