Monday, 13 July 2026

जागतिक पटलावर पोहोचणार आषाढी वारीचा आध्यात्मिक वारसा !

 वारीप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आस्था;


जागतिक पटलावर पोहोचणार आषाढी वारीचा आध्यात्मिक वारसा !


महाराष्ट्राची संतपरंपरा, वारकरी संप्रदायाची अखंड भक्ती आणि आषाढी वारीचा अलौकिक सोहळा ही महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक वारशाची ओळख आहे. वारी ही केवळ लाखो पावलांची यात्रा नसून मानवता, समता, बंधुभाव आणि सामूहिकतेचा संदेश देणारा महाराष्ट्राचा निर्मळ झरा आहे. या परंपरेविषयी असलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धा, संवेदनशीलता आणि बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली, ती माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित 'पंढरपूरची वारी आणि संतांच्या पाऊलखुणा' या माहितीपटाच्या प्रीमियरच्या निमित्ताने.


राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असते, तेव्हा मंत्रालयापासून विधानभवनापर्यंत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. निर्णय, चर्चा, बैठका आणि राज्यकारभाराच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून एखाद्या कार्यक्रमासाठी वेळ काढणे सहज शक्य नसते. मात्र, जेव्हा विषय पंढरपूरच्या वारीचा आणि संतांच्या विचारांचा असतो, तेव्हा वेळ हा अडथळा राहत नाही. राज्याच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आयनॉक्स चित्रपटगृहात उपस्थित राहून हा प्रीमियर शो पाहिला. ही उपस्थिती केवळ एका औपचारिक कार्यक्रमासाठी नव्हती, तर महाराष्ट्राच्या संतपरंपरेला आणि विठ्ठलभक्तीला मुख्यमंत्र्यांनी दिलेला तो सर्वोच्च सन्मान होता.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi