Monday, 13 July 2026

पंढरपूरची वारी आणि संतांच्या पाऊलखुणा' हा माहितीपट

 पंढरपूरची वारी आणि संतांच्या पाऊलखुणा' हा माहितीपट केवळ दृश्य माध्यमातील कलाकृती नाही, तर महाराष्ट्राच्या अध्यात्माचा एक प्रभावी दस्तऐवज आहे. मोठ्या पडद्यावर टाळ-मृदंगाचा निनाद, अभंगांचा गजर, दिंड्यांचा उत्साह आणि लाखो वारकऱ्यांच्या मुखी असलेले ‘ज्ञानोबा-तुकाराम’चे सूर जेव्हा गुंजले, तेव्हा प्रेक्षकांना जणू प्रत्यक्ष वारीत चालत असल्याची अनुभूती आली. चित्रपटगृह काही क्षणांसाठी पंढरपूरच्या वारीतच रूपांतरित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


या विशेष उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, आषाढी वारीचा हा अद्वितीय सांस्कृतिक वारसा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने २२ मिनिटांचा इंग्रजी माहितीपट तयार करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांनी दिलेला समता व भक्तीचा संदेश आता भाषेच्या मर्यादा ओलांडून जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राची ही अमूल्य परंपरा मांडण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi