वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'निर्मलवारी-समृद्धवारी व 'चरणसेवा' उपक्रमाचा समारोप
पंढरपूर, दि.२४: चरणसेवा उपक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर आणि स्वयंसेवकांनी आपल्या आई वडिलांप्रमाणे भक्तीभावाने थकलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा केली आणि त्यांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या. वारकऱ्यांच्या सेवेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भारताच्या युवा शक्तीचे चित्र, भारत आणि महाराष्ट्र धर्म पाहायला मिळतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
पंचायत समिती, पंढरपूर येथे ग्रामविकास आणि पंचायतराज विभागातर्फे आयोजित ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment