जल जीवन मिशन योजनेच्या कामासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध
- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
मुंबई, दि. १० : राज्यातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत राज्यातील ५१ हजार ५६० योजनांपैकी सुमारे २८ हजार योजना पूर्ण झाल्या असून उर्वरित योजनांची कामेही वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन आवश्यक निधी उपलब्ध करून जात आहे, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य ॲड. अनिल परब यांनी विधान परिषदेत या विषयी प्रश्न मांडला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सतेज पाटील, प्रवीण दरेकर,बच्चू कडू, प्राजक्त तनपुरे, धैर्यशील कदम यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment