परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जून २०२६ रोजी रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठवून राज्य शासनाची भूमिका पुन्हा स्पष्ट केली असून, विदर्भातील रेल्वे संपर्क मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेला आर्थिक वाटा उचलण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळावी यासाठी रेल्वे मंत्रालयाशी सातत्याने समन्वय साधला जात असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
मंत्री सरनाईक म्हणाले की, या रेल्वे मार्गाचे महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येईल. तसेच रेल्वेमंत्र्यांची संयुक्त बैठक घेऊन प्रकल्पास तातडीने मंजुरी मिळावी आणि मूर्तिजापूर–यवतमाळ तसेच मूर्तिजापूर–अचलपूर रेल्वे मार्ग लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल.
याबाबत सदस्य बच्चू कडू लक्षवेधी सूचना यांनी मांडली. यावेळी चर्चेत सदस्य संजय खोडके, प्रविण दरेकर यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment