Wednesday, 29 July 2026

अंगणवाडी केंद्रांतील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबवा - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुंबई, दि. २८ : राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा अधिक सक्षम करून बालकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयात नंदुरबार, अमरावती (मेळघाट), गडचिरोली, पालघर (वसई वगळून) आणि रायगड (कर्जत-१ व २) या पाच जिल्ह्यांमधील एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) अंतर्गत अंगणवाडी केंद्रांतील पायाभूत सुविधा, आवश्यक उपकरणांची उपलब्धता तसेच जून २०२६ अखेरच्या बालपोषण स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 अंगणवाडी केंद्रांतील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश

 कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबवा

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. २८ : राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा अधिक सक्षम करून बालकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मंत्रालयात नंदुरबार, अमरावती (मेळघाट), गडचिरोली, पालघर (वसई वगळून) आणि रायगड (कर्जत-१ व २) या पाच जिल्ह्यांमधील एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) अंतर्गत अंगणवाडी केंद्रांतील पायाभूत सुविधा, आवश्यक उपकरणांची उपलब्धता तसेच जून २०२६ अखेरच्या बालपोषण स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi