Monday, 13 July 2026

कोंढवा परिसरात सुरक्षा उपाययोजना अधिक कडक; आवश्यकतेनुसार कॉम्बिंग ऑपरेशन

 कोंढवा परिसरात सुरक्षा उपाययोजना अधिक कडक;

आवश्यकतेनुसार कॉम्बिंग ऑपरेशन

- राज्यमंत्री योगेश कदम

 

मुंबई, दि. १० : पुण्यातील कोंढवा परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. गरज भासल्यास कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येईल तसेच पोलीस बंदोबस्त, गस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणा वाढविण्यासह अतिरिक्त पोलीस चौकी उभारण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिली.

नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य योगेश टिळेकर यांनी याबाबत सूचना मांडली होती.

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, काही महिन्यांपूर्वी अशाच एका प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर तपासादरम्यान गंभीर बाबी समोर आल्याने हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे वर्ग करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये तथ्य असल्यास आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल.

संबंधित भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस आयुक्तांना आवश्यक सूचना दिल्या जातील. गरज भासल्यास अतिरिक्त पोलीस चौकी सुरू करणे, पोलीस बंदोबस्त वाढविणे तसेच एसआरपीएफची कायमस्वरूपी पोलीस व्हॅन उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

या परिसरात घडणाऱ्या सर्व घटनांवर पोलिसांसह दहशतवादविरोधी पथक (एटीएस) सातत्याने लक्ष ठेवून असून, देशविरोधी घोषणाबाजी किंवा घुसखोरीसंदर्भातील कोणतीही घटना समोर आल्यास तिची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi