Sunday, 19 July 2026

तीन उन्नत मार्गांमुळे पुण्याची वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार

 तीन उन्नत मार्गांमुळे पुण्याची वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार

 – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 

पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची गंभीर समस्या दूर करण्यासाठी पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत हे तीन उन्नत मार्गांचे प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाची मोठी अडचण असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे उन्नत मार्ग उभारले जात आहेत. या तिन्ही प्रकल्पांच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत असून, त्यामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पांच्या उभारणीसाठी राज्य शासनाने दिलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल गडकरी यांनी समाधान व्यक्त केले. या प्रकल्पांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पोलाद आणि सिमेंटवरील राज्य शासनाच्या हिश्श्याचा वस्तू व सेवा कर माफ करण्यात आला आहे. तसेच, वाळू, खडी आणि अन्य बांधकाम साहित्यावरील स्वामित्व धन माफ करण्याबरोबरच भूसंपादन प्रक्रियेलाही शासनाने मोठे सहकार्य केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळेच या प्रकल्पांना अपेक्षित गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi