पुणे व पीएमआरडीए क्षेत्राच्या पुढील ३० ते ४० वर्षांच्या विकासाचा विचार करताना पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वाढती लोकसंख्या लक्षात घेता केवळ पाण्याचे नवे स्रोत शोधण्यावर अवलंबून न राहता, वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावर शासनाने भर दिला आहे. जायका व जागतिक बँकेच्या सहकार्याने अनेक जलशुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) उभारण्यात येत असून, नद्या व तलावांना प्रदूषित करणारे शहरी सांडपाणी शुद्ध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहे.
पुणे शहर हे अभियांत्रिकी व नवउद्यमांचे (स्टार्टअप) प्रमुख केंद्र असून पुढील काळात ते अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) व जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख हब बनेल. देशातील एकूण जीसीसीपैकी जवळपास ३५ टक्के केंद्र एकट्या पुण्यात उभी राहत आहेत. इतर शहरांसारखी पुण्याची वाहतूक कोंडीची अवस्था होऊ नये, यासाठी हे सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण केले जातील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
No comments:
Post a Comment