Tuesday, 14 July 2026

कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम

 कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम

•       काळा घोडा आर्ट एवेन्यू सुशोभीकरण कामांचे लोकार्पण

 

            मुंबई, दि. १४ : मुंबईचे वैभव असलेल्या काळाघोडा परिसरातील रस्त्यांचे अत्यंत उत्तमरित्या सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरण कामातून कलात्मक व तत्कालीन वास्तुकलेशी समरसता जपण्यात आली आहे. कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा झालेल्या संगमातून या परिसराचे नवे रूप नागरिकांना अनुभवता येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते काळा घोडा आर्ट एवेन्यू सौंदर्यीकरण कामांचे लोकार्पण काळा घोडा प्लाझा, बी. भरूचा मार्ग येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

            नागरिकांसाठी असलेली ही व्यवस्था 'हेरिटेज वॉक' आहे. येथील पाथ वे आणि प्रत्येक जागेला कलात्मक स्पर्श करण्यात आला आहे. अत्यंत सुंदर व्यवस्था आहे त्याच शिस्तीमध्ये सुरू राहावी, यासाठी येथे येणारे नागरिक, येथील व्यावसायिक यांनी दक्षता घ्यावी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi