थोडक्यात काळा घोडा परिसर सुशोभीकरण..
दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसर युनेस्कोच्या ‘व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको आसम्बल ऑफ मुंबई’ या जागतिक वारसा स्थळाला लागूनच असल्यामुळे मुंबईकरांना हेरिटेज वॉकचा आनंद घेता यावा, यासाठी पाच रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामध्ये परिसरातील साईबाबा मार्ग, रोप वॉक लेन, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग, फोर्ब्स स्ट्रीट, रुदरफोर्ड स्ट्रीट व बी. भरुचा मार्ग या रस्त्यांच्या समावेश आहे. येथे संग्रहालये, कला दालने व ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारती आहेत. दरवर्षी भरविला जाणारा काळा घोडा कला महोत्सव या परिसराची सांस्कृतिक ओळख आहे.
बी. भरूचा मार्गावरील चौकात ‘प्लाझा’ साकारण्यात आला असून करडा आणि काळा ग्रॅनाईट तसेच बेसॉल्ट फरशीचा यासाठी वापर करण्यात आला आहे.
या प्लाझाजवळ टेबल-खुर्चीवर बसून मुंबईकर, पर्यटक या परिसराचा, येथील स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेवू शकणार आहेत. आकर्षक स्ट्रीट आर्ट भित्तिचित्रे आणि सार्वजनिक बसण्याच्या खास जागा देऊन अधिक पादचारी-स्नेही मार्ग बनविण्याता आला आहे.
No comments:
Post a Comment