Thursday, 9 July 2026

डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी निधी उपलब्ध करून देणार

 डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी निधी उपलब्ध करून देणार

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

               मुंबई, दि. 9 — डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी शिक्षण विभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आला असून, त्यामध्ये कार्यालय, ग्रंथालय आणि निवासस्थानाचा समावेश असलेला सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवून आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली.

           डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासंदर्भातील लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. ही लक्षवेधी सदस्य सुलभा खोडके यांनी मांडली होती. यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी चर्चेत सहभाग घेतला.

           राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, संकुलाच्या उभारणीसाठीचा प्रस्ताव अधिक व्यापक स्वरूपात तयार करण्यात येत असून, त्यामध्ये कार्यालय, ग्रंथालय आणि निवासस्थान यांचा समावेश करण्यात आला आहे. सुधारित प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तो वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल आणि आवश्यक निधीची तातडीने पूर्तता करण्यात येईल.

          राज्यातील शासकीय शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या 'सीएमश्री शाळा' उपक्रमाबाबात सदस्य अतुलबाबा भोसले यांनी केलेल्या मागणीवर माहिती देताना राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले की, पीएम श्री शाळांच्या धर्तीवर राज्यात सीएमश्री शाळा सुरू करण्यात आल्या असून, शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी ४ हजार ८०० शाळांची निवड करण्यात आली आहे. वित्त विभागाची मंजुरी मिळताच या शाळांच्या सर्वांगीण विकासाची कामे तातडीने हाती घेण्यात येतील.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi