पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
पुण्याचा वाढता विस्तार आणि त्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर व हडपसर-यवत या तीन उन्नत महामार्ग प्रकल्पांमुळे पुण्याच्या विकासाला नवी गती मिळेल आणि हे मार्ग खऱ्या अर्थाने 'गेम चेंजर' ठरतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्व व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी नमूद केले.
पुणे-शिरूर उन्नत मार्ग अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बहुविध वाहतूक जोडणी या संकल्पनेवर आधारित असून, त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुकर होणार आहे. हडपसर-यवत मार्गामुळे वाहतुकीचा ताण कमी होऊन वेळेची बचत होईल, तर तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गामुळे औद्योगिक पट्ट्याला आधुनिक रस्ते संपर्क उपलब्ध होऊन मालवाहतुकीला वेग मिळेल तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment