Thursday, 9 July 2026

विद्यार्थीहित, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिक्षकांच्या हिताचा समतोल राखत

 शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले, विद्यार्थीहित, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिक्षकांच्या हिताचा समतोल राखत शालेय शिक्षण विभाग विविध सुधारणा राबवत आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा ७३ टक्के प्रवेश पूर्ण झाले असून, मागील वर्षीच्या तांत्रिक अडचणी दूर करून यंदा प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे.

खासगी क्लासेसचे नियमन करण्यासाठी विद्यार्थी व पालकांच्या हिताचा विचार करून स्वतंत्र कायद्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांसह इतर राज्यांच्या अनुभवाचाही त्यात समावेश करण्यात येणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi