सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे साकार होणार भक्ती,
संस्कृती आणि परंपरेचा अद्वितीय संगम
· सिनेसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्या विशेष सादरीकरणातून अनुभवता येणार भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा संगम
मुंबई, दि. 22 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त सोमवार, 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक.येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, अध्यात्म आणि सनातन परंपरेचे महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ हा भारतीय सांस्कृतिक अस्मिता, अखंड श्रद्धा आणि अध्यात्मिक परंपरेचा गौरव करणारा उपक्रम आहे. या पर्वाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीतील विविध भावविश्व, भक्तीपरंपरा आणि आध्यात्मिक मूल्यांचे कलात्मक सादरीकरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात चित्रपट अभिनेत्री संस्कृती बालगुडे व कलाकार समूह यांचे विशेष अध्यात्मिक सादरीकरण होणार असून, त्यांच्या अभिव्यक्तीतून भक्ती, संस्कृती आणि भारतीय परंपरेचे विविध पैलू रसिकांना अनुभवता येणार आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पवित्र परिसरात होणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम अध्यात्म आणि कलेचा सुंदर संगम ठरणार आहे. या माध्यमातून उपस्थितांना सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
No comments:
Post a Comment