Monday, 22 June 2026

मालाड पूर्व येथील नागरिकांच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या

 मालाड पूर्व येथील नागरिकांच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बी. एल. मुरारका मार्ग विस्तारीकरण रस्त्याचे लोकार्पण रविवार २१ जुने रोजी आमदार मा. अतुल भातखळकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.


या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करत मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. बी. एल. मुरारका मार्गाच्या विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांचा प्रवास
अधिक सुरक्षित व सुलभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

“मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत. नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारी अशी विकासकामे यापुढेही सुरू राहतील,” असे आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी सांगितले.

या लोकार्पण सोहळ्यास स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर नागरिक तसेच मोठ्या संख्येने परिसरातील रहिवासी उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी रस्ते विस्तारीकरणाच्या या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi