Monday, 22 June 2026

राज्याच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला अधिकार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 राज्याच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य शासनाने विकास कामांना अधिक गती दिली असल्याचे सांगत, राज्य जीडीपी, पायाभूत सुविधा, स्टार्टअप आणि एफडीआयमध्ये आघाडीवर असल्याचे  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील जनतेच्या आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. लांबलेला  पाऊस, शेती, पेरणी तसेच शेतकऱ्यांशी संबंधित सर्व विषयांवर विधायक चर्चा व्हावी, अशी सरकारची भूमिका आहे.

राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचाच आहे. त्यामुळे राज्य शासनाने यापूर्वी  36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी, 2022 मध्ये 15 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत, तसेच यापूर्वी प्रलंबित राहिलेल्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान 2023 मध्ये दिले आहे.  याशिवाय एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत, नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टरपर्यंत वाढविणे, गोगलगाईमुळे तसेच सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे निर्णयही सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi