Monday, 22 June 2026

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा:

 मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा:

राज्यपालांचे आवाहन

 

मुंबई, दि. २२ : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सर्जनशील क्षेत्रासाठी अमर्याद संधी उपलब्ध करून देत असली तरी तिचा वापर अत्यंत जबाबदारीने आणि विवेकाने केला गेला पाहिजे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी बोलताना केले. कृत्रिम बुद्धिमत्ता ही परिवर्तन घडवून आणणारी शक्ती आहे. मात्र तिचा वापर करताना चित्रपट निर्माते आणि सर्जकांच्या बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सात दिवसांपासून सुरु असलेला मिफ - २०२६ हा लघुकथा, माहितीपट आणि अॅनिमेशन चित्रपटांचा १९ वा द्विवार्षिक महोत्सवाची सांगता झाली. यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल म्हणाले की, गेल्या काही वर्षांत मिफ हा माहितीपट, लघुकथा आणि अॅनिमेशन चित्रपटांचा प्रतिष्ठित महोत्सव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) परिषदेचे उद्घाटन केले होते. या परिषदेमुळे सर्जनशील अर्थव्यवस्था आणि डिजिटल कथाकथन क्षेत्रात भारताला जागतिक केंद्र बनविण्याच्या देशाच्या आकांक्षेला बळ मिळाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi