Monday, 22 June 2026

गेल्या काही वर्षांत मिफ हा माहितीपट, लघुकथा आणि अॅनिमेशन चित्रपटांचा प्रतिष्ठित महोत्सव

 राज्यपाल म्हणाले की, गेल्या काही वर्षांत मिफ हा माहितीपट, लघुकथा आणि अॅनिमेशन चित्रपटांचा प्रतिष्ठित महोत्सव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) परिषदेचे उद्घाटन केले होते. या परिषदेमुळे सर्जनशील अर्थव्यवस्था आणि डिजिटल कथाकथन क्षेत्रात भारताला जागतिक केंद्र बनविण्याच्या देशाच्या आकांक्षेला बळ मिळाले.

यंदाच्या मुंबई चित्रपट महोत्सवामध्ये जगातील ४६ देशांतून १,४५९ चित्रपटांनी सहभाग घेतल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले.  या महोत्सवात ४२ हून अधिक भारतीय भाषा तसेच ३० आंतरराष्ट्रीय भाषांमधील चित्रपट प्रदर्शित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

माहितीपट समाजातील वास्तवाचे चित्रण करतात, इतिहास जतन करतात, रूढ समजुतींना आव्हान देतात आणि सामाजिक परिवर्तनाला चालना  देतात. माहितीपट समाजातील विविध घटकांच्या समस्यांना व्यासपीठ देतात आणि भविष्यातील समाज घडविणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधतात, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi