यंदाच्या मुंबई चित्रपट महोत्सवामध्ये जगातील ४६ देशांतून १,४५९ चित्रपटांनी सहभाग घेतल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. या महोत्सवात ४२ हून अधिक भारतीय भाषा तसेच ३० आंतरराष्ट्रीय भाषांमधील चित्रपट प्रदर्शित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
माहितीपट समाजातील वास्तवाचे चित्रण करतात, इतिहास जतन करतात, रूढ समजुतींना आव्हान देतात आणि सामाजिक परिवर्तनाला चालना देतात. माहितीपट समाजातील विविध घटकांच्या समस्यांना व्यासपीठ देतात आणि भविष्यातील समाज घडविणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधतात, असे त्यांनी सांगितले.
भारताकडे जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या असल्याचे नमूद करून राज्यपालांनी ग्रामीण आणि आदिवासी भागातील तरुण चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील अनुभव, परंपरा आणि संघर्ष यांवर आधारित कथा मांडण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. महिला चित्रपट निर्मात्यांचा अधिकाधिक सहभाग वाढावा, जेणेकरून त्यांच्या दृष्टिकोनांमुळे भारतीय कथाकथन अधिक समृद्ध होईल, असे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे चित्रपटनिर्मिती अधिक लोकाभिमुख झाली असून नव्या सर्जनशील संधी उपलब्ध झाल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले
No comments:
Post a Comment