Monday, 22 June 2026

मिफ आणि राज्यातील विद्यापीठांमधील माध्यम व मनोरंजन विभाग यांच्यात अधिक सहकार्य

 मिफ आणि राज्यातील विद्यापीठांमधील माध्यम व मनोरंजन विभाग यांच्यात अधिक सहकार्य व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.  अशा सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक चित्रपट प्रवाहांचा परिचय होईल आणि भविष्यातील सर्जनशील प्रतिभेला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते पोलंडच्या सिल्व्हरया चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा गोल्डन कॉंच पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच इराणच्या अंडर द स्नोया चित्रपटाला आंतरराष्ट्रीय विभागातील सर्वोत्कृष्ट लघुकथा चित्रपटासाठीचा सिल्व्हर कॉंच पुरस्कार आणि जर्मनीच्या मायाज साँगया चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपटासाठीचा सिल्व्हर कॉंच पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विभागातील सर्वोत्कृष्ट ध्वनी, सर्वोत्कृष्ट संपादक आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आले.

समारोप सोहळ्याला माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात कुमार, मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव व वित्तीय सल्लागार दीपक नारायण, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi