वन मंत्री गणेश नाईक म्हणाले,“वाटचाल वन विभागाची” या पुस्तकातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात यावी. यामुळे विविध उपक्रमांच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवणे आणि वेळेत अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.
वन प्रशासन अधिक आधुनिक आणि परिणामकारक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, भू-स्थानिक माहिती प्रणाली ई-ऑफिस आणि इतर डिजिटल साधनांचा व्यापक वापर वाढविण्यावर भर देण्यात यावा. डिजिटल गव्हर्नन्सच्या माध्यमातून निर्णय प्रक्रियेत गती, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे वन मंत्री नाईक यांनी सांगितले.
वनजमिनींच्या संरक्षणाच्या दृष्टीने महसूल विभाग आणि वन विभागाच्या नोंदींमधील तफावत दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावीत. तसेच महसूल विभागाच्या धर्तीवर वनजमिनींचे डिजिटल भुअभिलेख तयार करण्याची प्रक्रिया गतीमान करण्यात यावी. पीएम गती शक्ती पोर्टलवरील माहिती अद्ययावत ठेवावी असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.
No comments:
Post a Comment