Tuesday, 23 June 2026

मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी नियंत्रण कक्ष, ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर, रॅपिड रेस्क्यू टीम, प्राथमिक प्रतिसाद

 मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी नियंत्रण कक्ष, ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर, रॅपिड रेस्क्यू टीम, प्राथमिक प्रतिसाद पथके, एआय-आधारित अलर्ट प्रणाली आणि माकड निर्बीजकरण केंद्र यांसारख्या उपक्रमांच्या अंमलबजावणीला वेग देण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच वन्यजीव संवर्धनालाही चालना मिळणार आहे, असल्याची माहिती देण्यात आली.

 

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ३०० कोटी वृक्षलागवड अभियानाच्या अनुषंगाने दर्जेदार रोपांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी नर्सरींचे बळकटीकरण करण्यावर विशेष भर देण्यात आला. टिश्यू कल्चर आधारित रोपनिर्मितीला गती देण्याबरोबरच इतर नर्सरींच्या क्षमतेत वाढ करण्यात यावीत. आगामी वृक्षारोपण मोहिमांचे नियोजन वेळेत पूर्ण करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. विविध योजनांसाठी आवश्यक निधी मागणी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश वन मंत्री नाईक यांनी दिले. अर्थसंकल्पीय तरतुदींचा पूर्ण लाभ घेत विकासकामांना अधिक गती द्यावी असे निर्देश त्यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi