Tuesday, 23 June 2026

वाटचाल वन विभागाची” संकल्प २०२९ या पुस्तकाचे प्रकाशनवनसंपदेचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन

 राज्यातील वनसंपदेचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि लोकसहभाग यांचा समन्वय साधत वन विभागाला अधिक सक्षम बनविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार वन मंत्री गणेश नाईक यांनी केला.

 

वन मंत्री गणेश नाईक म्हणाले, वन विभागाला तंत्रज्ञानसक्षम बनविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. डिजिटल गव्हर्नन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन सर्वेक्षण आणि जीआयएस  आधारित व्यवस्थापनाच्या माध्यमातून वन संरक्षणाला नवे बळ मिळेल. वनसंपत्तीचे संवर्धन, अतिक्रमणांवर नियंत्रण, वनवणव्यांचे प्रभावी व्यवस्थापन आणि नागरिकांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी विभागात व्यापक सुधारणा राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्राचा वन विभाग देशातील सर्वात आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित विभाग बनविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे वन मंत्री नाईक यांनी सांगितले.

 

वन विभागाच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या वाटचाल वन विभागाची संकल्प २०२९ या पुस्तकाचे प्रकाशन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi