Tuesday, 23 June 2026

मुदत संपलेले व बंद हायड्रोप्रोजेक्ट कार्यान्वित करावेत

 मुदत संपलेले व बंद हायड्रोप्रोजेक्ट कार्यान्वित करावेत

-         जलसंपदा मंत्री (कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील

·         अहिल्यानगर शहरातील सीना नदीचे पुनर्जीवन कामास गती देण्याचे निर्देश

 

मुंबई, दि. 22 : कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुदत संपलेले व बंद हायड्रोप्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी प्रक्रिया करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

 

मंत्रालयात कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ हनुमंत धुमाळ आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi