Tuesday, 23 June 2026

तंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकाभिमुख वन प्रशासनासाठी वेगाने काम करा

 तंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकाभिमुख वन प्रशासनासाठी वेगाने काम करा

वन मंत्री गणेश नाईक

 

मुंबई, दि. २२  : राज्यातील वन प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी वन विभागाने प्राधान्याने कार्यवाही करावी, तसेच वनजमिनींचे संरक्षण, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि ३०० कोटी वृक्षलागवड अभियानाची प्रभावी अंमलबजावणी यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

 

वन विभागाच्या विविध योजनांचा आणि प्राधान्याच्या विषयांचा सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठकीत घेण्यात आला. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एम.श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम.एस.रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) विवेक खांडेकर, उपसचिव निकीता पांडे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi