Tuesday, 23 June 2026

शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक

 शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक


- मंत्री छगन भुजबळ


· बंद केंद्रे लवकरच सुरू करणार

मुंबई, दि. 23 : शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून, काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील विशेषतः पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत विधानपरिषद सदस्या उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi