मुंबई आणि परिसरातील व्यसनाधीन रुग्णांच्या पुनर्वसनासाठी विशेष केंद्रे उभारण्याकरिता जमीन उपलब्ध करून देण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले जाणार आहेत. याशिवाय आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात व्यसनमुक्ती केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
चित्रपट आणि इतर माध्यमांमधून होणाऱ्या अमली पदार्थांच्या उदात्तीकरणाबाबतही शासन गंभीर असून त्यावर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment