Sunday, 31 May 2026

महिला शेतकरी, ग्रामीण उद्योजकता आणि आर्थिक समावेशनासाठी बँकांनी अधिक सक्रिय व्हावे

 महिला शेतकरी, ग्रामीण उद्योजकता आणि आर्थिक समावेशनासाठी

बँकांनी अधिक सक्रिय व्हावे

- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात सक्षम अर्थव्यवस्थांपैकी एक असून राज्याचा आर्थिक विकास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी बँकिंग क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. आर्थिक समावेशन, महिला सक्षमीकरण, ग्रामीण उद्योजकता आणि महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वित्तीय धोरणाची गरज यावर त्यांनी विशेष भर दिला.

राज्याचा सीडी रेशो ९८.०२ टक्के असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. ग्रामीण उद्योजकता आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी बँकांनी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जनधन योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजना यामुळे आर्थिक समावेशनाला मोठी गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. आधार सिडिंग, रुपे कार्ड वितरण आणि खात्यांचे सक्रियकरण यावर अधिक भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्याच प्रमाणे महिला सक्षमीकरणासाठी विशेष वित्तीय धोरणाची गरज अधोरेखित करुन सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की,  महिला बचत गट, महिला उद्योजक आणि ग्रामीण महिलांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देत महिलांचे आर्थिक सक्षमीकरण अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi