स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभारा
- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. २७ : पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाचे कठोर धोरण आहे. या कायद्याच्या व्यापक प्रसार, प्रचार व अंमलबजावणीत राज्य तपासणी व संनियंत्रण समितीच्या सदस्यांनी आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन करून समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभारली जावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
आरोग्य भवन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य तपासणी व संनियंत्रण समितीची बैठक झाली. बैठकीस आमदार स्नेहा दुबे, प्रधान सचिव निपुण विनायक, अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक (विलटो) डॉ. दिगंबर कानगुले, सहाय्यक संचालक डॉ. वैशाली बडधे व समितीचे सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment