सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी आणखी तीन वर्षांसाठी
‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ राबविणार
मुंबई, दि. १४ : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करून दोन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी ‘सिंधुरत्न समृध्द योजना २.०’ आणखी तीन वर्षासाठी २०२८-२९ पर्यंत राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. योजना कालावधीत दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी २०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात ही योजना पुढील तीन वर्षासाठी प्रस्तावित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार २०२८-२९ पर्यंत ही योजना राबविण्यात येणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि समुद्र किनारा यांच्या वापरातून पर्यटन आणि मत्स्यव्यवसायास चालना देऊन रोजगार निर्मिती करणे आणि दरडोई उत्पन्नात वाढ करण्याचे नियोजन आहे.
या योजनेतून बंदर धक्का आणि पर्यटन नौका केंद्राच्या ठिकाणी मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि जलक्रीडाकरिता पायाभूत सुविधा करणे, पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मुलभूत व्यवस्था निर्माण करणे, अविकसित बँक वाँटरच्या परिसरात जलक्रीड़ा प्रकारांना चालना देण्यासाठी मुलभूत सुविधा विकास करणे, कॅराव्हँन कॅम्पिंग सुविधा आणि मार्गावर पायाभूत सुविधा विकास करणे, मासळी उतरविण्याचे केंद्र विकसित करणे, मासळी बाजाराकरिता सुविधा करणे, मत्स्य बीज उत्पादन केंद्र, मत्स्य साठवणूक, विक्री केंद्र आणि मत्स्यालय उभारणे आदी कामे करता येणार
No comments:
Post a Comment