मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील हजारो रुग्णांसाठी डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय हे महत्त्वाचे सार्वजनिक आरोग्य केंद्र मानले जाते. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर या रुग्णालयावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अॅनालायझरची उपलब्धता ही सार्वजनिक आरोग्यसेवेला मोठा आधार ठरणार आहे.
या उपक्रमामुळे प्रयोगशाळेतील कार्यपद्धती अधिक कार्यक्षम होणार असून अहवालांचा ‘टर्नअराउंड टाइम’ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नमुन्यांचे विश्लेषण अधिक अचूकपणे करता येणार असल्याने उपचार प्रक्रियेलाही गती मिळणार आहे.
इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात सातत्याने करण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे सार्वजनिक आरोग्य संस्थांची क्षमता वाढत असून, नागरिकांना अधिक सक्षम व विश्वासार्ह वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे
No comments:
Post a Comment