Thursday, 21 May 2026

शेतकऱ्यांनी साठवलेला शेतमाल "डिजिटल" विक्रीसाठी व्यवस्था विकसित करण्यावर भर

 शेतकऱ्यांनी साठवलेला शेतमाल "डिजिटल" विक्रीसाठी व्यवस्था विकसित करण्यावर भर

बाजारात भाव कमी झाल्यानंतर शेतकरी गोदामात शेतमाल साठवणूक करतात, साठवलेल्या शेतमालासाठी ब्लॉकचेन शेतमाल तारण कर्ज योजनेबरोबरच आता येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचा रियल टाईम डाटा एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना देशात कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव आहे हे कळू शकेल तसेच शेतकऱ्यांना आपल्या साठवलेल्या मालाची देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ही डिजिटल व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन सर्वांनी समन्वयाने व जलद गतीने करावे असे निर्देश ही मंत्री रावल यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi