Tuesday, 19 May 2026

सिंधुदुर्गात साकारतेय भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प निवृत्त आयएनएस गुलदार ठरणार जागतिक दर्जाचे समुद्री पर्यटन आकर्षण

 सिंधुदुर्गात साकारतेय भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प

निवृत्त आयएनएस गुलदार ठरणार जागतिक दर्जाचे समुद्री पर्यटन आकर्षण

- जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

 

 

सिंधुदुर्गनगरी, दि. 18 : निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम समुद्री प्रवाळ प्रकल्प आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक्स परिसरात साकारत असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देशातील सागरी पर्यटन क्षेत्राला नवे परिमाण देणारा ठरणार आहे. भारतीय नौदलाची अभिमानास्पद युद्धनौका आयएनएस गुलदार सेवामुक्त झाल्यानंतर आता या युद्धनौकेचे रूपांतर समुद्राखालील अद्वितीय पर्यटन केंद्रात करण्यात येत आहे. समुद्रतळाशी नियोजित पद्धतीने विसर्जित करण्यात येणारी ही युद्धनौका पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या नैसर्गिक संपदेचा शाश्वत विकास साधत पर्यटन क्षेत्राला नवे आयाम देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अंडरवॉटर म्युझियम आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्पामुळे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतील. स्थानिक युवकांना रोजगार, पर्यटन व्यवसायाला गती आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास या प्रकल्पाचा मोठा हातभार लागणार असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi