Saturday, 30 May 2026

नागरिकांना तक्रार करणे सोपे व्हावे यासाठीमोबाईल ॲप आणि टोल-फ्री क्रमांक:

 नवीन मोबाईल ॲप आणि टोल-फ्री क्रमांक: नागरिकांना तक्रार करणे सोपे व्हावे यासाठी प्रशासनातर्फे लवकरच एक नवीन मोबाईल ॲप विकसित करण्यात येणार आहे, तसेच एक टोल-फ्री क्रमांक देखील कार्यान्वित करण्यात आला आहे.

तक्रार कशी करावी?:

औषधांच्या दर्जाबाबत शंका असल्यास किंवा अवैध साठवणुकीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित एफडीएकडे तक्रार करावी. तक्रार करताना आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक तसेच संशयित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि औषधाचे नाव स्पष्टपणे नमूद करावे.

गोपनीयतेची हमी

नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींची अत्यंत गोपनीयतेने पडताळणी करून तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सह आयुक्त, (औषधे) गणेश . रा. रोकडे यांनी कळविले आहे.

आयुक्त मुंढे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना जनतेच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या विभागांमध्ये मोहीम राबवण्यात आली.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi