महाराष्ट्रात दोन वर्षात 50 लाख लाडक्या बहिणी लखपती केल्या आहेत. आता 1 कोटी बहिणींना लखपती करण्याचे उद्दिष्ट असून त्याद्वारे अर्थव्यवस्था संचलित होईल आणि देशाची अर्थ व्यवस्था पाच ट्रीलियन करण्यामध्ये निश्चितपणे मदत मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी ग्रामीण रस्त्यांसाठी केंद्र शासनाने 123 कोटी निधी उपलब्ध करुन दिल्याचे सांगून देश संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला साथ देऊया, परकीय चलन वाचविण्यासाठी सोन्याची खरदी, परदेशी दौरे टाळूया. इंधनाचा वापर कमी करुया, असेही आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
No comments:
Post a Comment