महाआवान अभियान 2023-2024 : राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात प्रथम- कोकण, द्वितीय- नाशिक, तृतीय- नागपूर हे विभाग ठरले. तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम- नागपूर, द्वितीय- अमरावती, तृतीय- नाशिक हे विभाग ठरले.
सर्वोत्कृष्ट जिल्हे या गटात प्रधानमंत्री आवास ग्रामीणमध्ये प्रथम- गोंदिया, द्वितीय -पालघर, तृतीय -अकोला हे जिल्हे ठरले. तर राज्य पुरस्कृत आवास योजना मध्ये प्रथम- नांदेड, द्वितीय- अमरावती, तृतीय- वर्धा हे जिल्हे ठरले.
सर्वोत्कृष्ट तालुके या गटात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये प्रथम- तालुका पातुर, जि. अकेाला, द्वितीय -अहिल्यानगर जि, अहिल्यानगर, तृतीय -तालुका मौदा, जि. नागपूर. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम -तालुका शिरपूर, जि.धुळे, द्वितीय- ता. कारंजा, जि. वर्धा आणि विभागून ता. खेड जि. पुणे, तृतीय- ता. माहुर, जि. नांदेड हे तालुके ठरले.
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या गटात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये प्रथम- ग्रामपंचायत मन्नेवाडी, ता. पाटण, जि. सातारा आणि ग्रामपंचायत लिंब, ता.जि. सातारा, द्वितीय- ग्रामपंचायत डोंगरगाव, ता. सावली, जि. चंद्रपूर, तृतीय -ग्रामपंचायत वाईगोळ, ता. मनोरा, जि. वाशीम हे ठरले.
राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम- ग्रामपंचायत अजनसरा, ता. हिंगणघाट, जि. वर्धा, द्वितीय- ग्रामपंचायत दिक्षी, ता. निपाड, जि. नाशिक, तृतीय -ग्रामपंचायत देपूल, ता. वाशिम, जि. वाशिम, ग्रामपंचायत बलवडी ता. खानापूर जि. सांगली हे ठरले.
सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत या गटात प्रधानमंत्री आवास ग्रामीणमध्ये प्रथम- ग्रामपंचायत धनेगाव, ता. जामखेड जि. अहिल्यानगर, द्वितीय- ग्रामपंचायत वर्धामनेरी, ता. आरवी जि. वर्धा, तृतीय -ग्रामपंचायत धेकवड, ता. जि. नंदुरबार हे ठरले. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम -ग्रामपंचायत राजुरी, ता. राहता जि. अहिल्यानगर, द्वितीय -ग्रामपंचायत वाकन, ता. पोलादपूर जि. रायगड, तृतीय- ग्रामपंचायत बेलोरा बु.,ता. अकोट, जि. अकोला हे ठरले.
सर्वोत्कृष्ट गृह संकुल या गटात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रथम- ग्रामपंचायत ससेगाव, ता. कुही, जि. नागपूर, द्वितीय- ग्रामपंचायत अंतरोळी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर, तृतीय- ग्रामपंचायत गंधाली, ता. अमळनेर- जि. जळगाव हे ठरले.राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम- ग्रामपंचायत आसखेड खु., ता. खेड, जि. पुणे हे ठरले.
No comments:
Post a Comment