वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी 'एआय'चा वापर करावा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· आवश्यक वीजनिर्मिती व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज
· उन्हाळ्याच्या काळातील 'पीक डिमांड' संदर्भात वीज वितरण आढावा बैठक
मुंबई, दि १८: वीजनिर्मिती व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी 'एआय'चा वापर करून यासंदर्भातील व्यवस्थापन करण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उन्हाळ्याच्या काळातील 'पीक डिमांड' संदर्भात वीज वितरण आढावा बैठक झाली. यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ श्रीकर परदेशी, टाटा पॉवर, अदाणी पॉवरचे व 'बेस्ट'चे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उन्हाळा व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात. यासाठीच्या व्यवस्थापनासाठी तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी 'एआय'चा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
No comments:
Post a Comment