आवश्यक वीजनिर्मिती व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज
रुफटॉप सौर ऊर्जेमुळे फायदा होत आहे. वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा व पाण्याची उपलब्धताही आहे. वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत रहावा यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मॉन्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामेही करण्यात येत आहेत. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती यावेळी ऊर्जा विभागामार्फत देण्यात आली.
· कोयना जलविद्युत प्रकल्प: गरजेनुसार १८०० मेगावॅट पर्यंत पूर्ण क्षमतेने वापर
· आपत्कालीन परिस्थितीत: आवश्यकतेनुसार अतिरिक्त वीज खरेदी
· एमएमआरमधील प्रसारण प्रणालीचे मजबूतीकरण
पुरेशा वीज खरेदीची व्यवस्था
· मुंबई आयलँडिंग योजना कार्यरत ही एक महत्त्वाची सुरक्षा यंत्रणा असून, ग्रीडमध्ये बिघाड झाल्यास मुंबईला स्वतंत्रपणे चालवण्याची क्षमता.
· मोठ्या प्रमाणातील वीज खंडित होण्यापासून संरक्षण
· भिरा पंप्ड स्टोरेज प्रकल्प कार्यरत
· सर्व ब्लॅक स्टार्ट ड्रिल्स यशस्वीरीत्या पूर्ण
· राज्य लोड डिस्पॅच केंद्र (SLDC) च्या बॅकअप कंट्रोल ड्रिल पूर्ण ज्यामुळे मुख्य नियंत्रण केंद्रात अडचण आल्यास कामकाज सुरळीत चालू राहू शकते.
No comments:
Post a Comment